एक्स्प्लोर
टी-20 ब्लास्ट : शाहिद आफ्रिदीचं हॅम्पशायरकडून वादळी शतक
शाहिद आफ्रिदीने हॅम्पशायरकडून खेळताना केवळ 43 चेंडूत 101 धावा करुन त्याच्या टी-20 कारकीर्दीतलं पहिलं शतक ठोकलं.
नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी स्फोटक खेळाडू शाहिद आफ्रिदीने अनेक दिवसांनंतर त्याच्या जुन्या शैलीत खेळी केली. त्याने हॅम्पशायरकडून खेळताना केवळ 43 चेंडूत 101 धावा करुन त्याच्या टी-20 कारकीर्दीतलं पहिलं शतक ठोकलं. त्याच्या या खेळीच्या जोरावर हॅम्पशायरने डर्बीशायरवर 101 धावांनी मात केली.
आफ्रिदीने या खेळीत 7 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं. हॅम्पशायरचा कर्णधार जेम्स विंसने 36 चेंडूत 55 धावा करुन डर्बीशायरला 249 धावांचं लक्ष्य दिलं. मात्र या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या डर्बीशायरचा संघ 148 धावांवरच माघारी परतला.
https://twitter.com/NatWestT20Blast/status/900094918760288256
आफ्रिदीने पाकिस्तानकडून 27 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 1716 धावा आहे. तर 398 वन डेमध्ये 23 पेक्षा जास्त सरासरीने त्याच्या नावावर 8 हजार 64 धावा आहेत. शिवाय 98 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 18 च्या सरासरीने 1405 धावा केल्या आहेत.
https://twitter.com/NatWestT20Blast/status/900248059837329409
आफ्रीदीने क्रिकेटच्या मैदानात केवळ फलंदाजीनेच नव्हे, तर गोलंदाजीनेही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कसोटीत 48, वन डेत 395 आणि टी-20 मध्ये 97 विकेट त्याच्या नावावर आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement