एक्स्प्लोर

Mohammad Amir On Ind vs NZ Final T20 World Cup 2026: वेस्ट इंडिज, इंग्लंड, मग फायनलमध्येही भारताचा पराभव होणार; भविष्यवाणी करणारा मोहम्मद आमिर टीम इंडियाच्या विजयानंतर म्हणतो...

Mohammad Amir On Ind vs NZ Final T20 World Cup 2026: भारत आणि न्यूझीलंडच्या फायनलमध्ये न्यूझीलंड जिंकणार अशी भविष्यवाणी केली होती. मात्र फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा दारुण पराभव केला.

Mohammad Amir On Ind vs NZ Final T20 World Cup 2026: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या (T20 World Cup 2026) अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड (Ind vs NZ Final) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने तब्बल 96 धावांनी विजय मिळवला. भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. आयसीसी टी-20 विश्वचषक लागोपाठ दुसऱ्यांदा आणि आजवर तिसऱ्यांदा जिंकणारा टीम इंडिया हा पहिला संघ ठरला. भारताच्या या विजयानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू मोहम्मद आमिरने (Mohammad Amir ) प्रतिक्रिया दिली आहे.

सुपर-8 च्या भारत आणि वेस्ट इंडिजच्या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मोहम्मद आमिरने (Mohammad Amir) टीम इंडियाचा पराभव होणार, असा दावा केला होता. त्यानंतर सेमीफायनलमध्येही टीम इंडियाला इंग्लंड पराभूत करेल, अशी भविष्यवाणी मोहम्मद आमिरने केली होती. मात्र टीम इंडियाने सुपर-8 चा सामनाही जिंकला आणि इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलही जिंकली. त्यामुळे सोशल मीडियावर मोहम्मद आमिरला चांगलेच ट्रोल करण्यात आले. परंतु यानंतही मोहम्मह आमिर थांबला नाही. भारत आणि न्यूझीलंडच्या फायनलमध्ये न्यूझीलंड जिंकणार अशी भविष्यवाणी केली होती. मात्र फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा दारुण पराभव केला. यानंतर मोहम्मह आमिरला या सामन्याबाबत विचारले असता, तो संतापल्याचे पाहायला मिळाले. (Mohammad Amir On Ind vs NZ Final T20 World Cup 2026)

मोहम्मद आमिर काय म्हणाला? (Mohammad Amir On Team India)

भारत जिंकला, भविष्यवाणी चुकली...आता काय म्हणणं, असा सवाल मोहम्मद आमिरला विचारण्यात आला. यावर जिंकले तर जिंकले...ते विश्वचषक घरी त्यांच्या घरी घेऊन जातील. माझ्या घरी आणणार नाहीत, असं प्रत्युत्तर मोहम्मद आमिरने दिले. मी न्यूझीलंडला 2004 पासून फॉलो करतोय. मी कधीही न्यूझीलंडला असं खेळताना पाहिलेलं नव्हतं. न्यूझीलंडचा संघ पूर्णपणे दबावात खेळत होता. याचं टीम इंडियाचा क्रेडिट द्यायला हवं. टीम इंडिया सेमीफायनल आणि फायनल खूप चांगली खेळली, असं मोहम्मद आमिर म्हणाला. 

टीम इंडियाचं जोरदार सेलिब्रेशन (Team India Celebration T20 WC 2026)

न्यूझीलंडला पराभूत करुन पुन्हा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले. भारतीय संघातील खेळाडूंचे कुटुंबीय देखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या संजू सॅमसन, अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि इशान किशन (Ishan Kishan) या तीन फलंदाजांनी न्यूझीलंडच्या आक्रमणाच्या अक्षरश: चिंधड्या उडवल्या. भारताने सलामीच्या फलंदाजांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर भारतानं 20 षटकांत पाच बाद 255 धावांची मजल मारली होती.भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा अख्खा डाव 159 धावांत कोलमडला. भारताकडून जसप्रीत बुमरानं चार, तर अक्षर पटेलनं तीन विकेट्स काढून न्यूझीलंडला रोखण्यात मोलाची भूमिका बजावली.

संबंधित बातमी:

Shoaib Akhter On Ind vs NZ Final T20 World Cup 2026: टीम इंडियाने विश्वचषक जिंकताच शोएब अख्तरचं विधान चर्चेत; म्हणाला, रोहित-विराटला बाहेर काढलं आणि आता...

Gautam Gambhir Ind vs NZ Final T20 World Cup 2026: 2 भारतीय दिग्गजांना मी हा विश्वचषक समर्पित करतो...; गौतम गंभीरचा मास्टरस्ट्रोक, नेमकं काय म्हणाला?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Australia : बांगलादेशकडून झालेला पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर 
ऑस्ट्रेलियानं सलामीवीर बदलला, अपयशी खेळाडूला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Embed widget