एक्स्प्लोर

18 वर्षाच्या प्रज्ञानानंदने नंबर 1 कार्लसनचा घामटा काढला, पहिली बाजी बरोबरीत

भारतीय बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा प्रज्ञानानंद हा दुसरा भारतीय आहे.

Rameshbabu Praggnanandhaa vs Magnus Carlsen, Chess World Cup 2023 Final : भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंद (Rameshbabu Praggnanandhaa) याने फिडे बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील (FIDE World Cup Chess Tournament)पहिल्या क्लासिकल गेममध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याला बरोबरीत रोखले आहे. भारताच्या 18 वर्षीय ग्रँडमास्टरने आपल्यापेक्षा अधिक अनुभवी आणि उच्च दर्जाच्या खेळाडूविरुद्ध प्रभावी कामगिरी केली. प्रज्ञानानंद याने 35 चालीनंतर बरोबरी साधण्यासाठी यशस्वी खेळी केली. 

बुधवारी होणाऱ्या दुसऱ्या क्लासिकल सामन्यांच्या दुसऱ्या डावात कार्लसन पांढऱ्या सोंगट्याने सुरुवात करेल. त्यामुळे कार्लसन याच्याकडे विजयाची संधी जास्त आहे. 
प्रज्ञानानंद याने सेमीफायनलमध्ये जगातील तिसऱ्या क्रमांकाचा बुद्धीबळपटू फाबियानो याचा पराभव करत बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. प्रज्ञानानंद याने सेमीफायनलमध्ये 3.5-2.5 ने विजय मिळवत मोठा उलटफेर केला होता. आता फायनलमध्ये त्याने पहिल्या राऊंडमध्ये कार्लसन याला बरोबरीत रोखलेय. आता बुधवारी काय होतेय? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. 

भारतीय बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा प्रज्ञानानंद हा दुसरा भारतीय आहे.  प्रज्ञानानंद याने 2024 कँडिडेट्स स्पर्धेच्या यादीत आपले स्थान निश्चित केलं आहे. पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद हे आतापर्यंत कँडिडेट्सच्या स्पर्धेत खेळलेले एकमेव भारतीय आहेत. त्यानंतर आता प्रज्ञानानंदने कँडिडेट्स स्पर्धेतही धडक मारली आहे.

वयाच्या तिसऱ्या वर्षापासून बुद्धीबळ

18 वर्षांचा आर. प्रज्ञानानंद हा मूळचा चेन्नईचा आहे. 2018 मध्ये प्रज्ञानानंदने ग्रँडमास्टर किताब पटकावला होता. प्रज्ञानानंदने वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी ग्रँडमास्टर बनण्याचा इतिहास रचला होता. प्रज्ञानानंद वयाच्या तिसऱ्या वर्षापासून बुद्धीबळ खेळत आहे.  

प्रज्ञानानंदला बुद्धीबळ खेळण्याची प्रेरणा त्याची बहिण वैशालीपासून मिळालेय. प्रज्ञानानंदच्या वडिलांनी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, वैशालीने टीव्हीवर कार्टून कमी पाहावं, यासाठी आम्ही तिला बुद्धीबळ शिकवलं. तिला पाहून प्रज्ञानानंदही खेळू लागला. त्यानंतर दोघांनाही बुद्धीबळ खेळ आवडला आणि दोघंही खेळू लागले. त्यांनी त्यातच करिअर करायचं ठरवलं आणि त्यांना यशही मिळालं म्हणून आम्ही आनंदी आहोत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget