WTC Final : सामन्याच्या पहिल्याच दिवशी वरुणराजाची खेळी पाहून ट्विटरवर धम्माल मीम्सचा पाऊस
पावसानं हजेरी लावली आणि जागतिक कसोटीच्या अंतिम सामन्याचा पहिलाच दिवस वरुणराजानं गाजवला.
![WTC Final : सामन्याच्या पहिल्याच दिवशी वरुणराजाची खेळी पाहून ट्विटरवर धम्माल मीम्सचा पाऊस Rain delays India vs Nz WTC Final Twitter flooded with memes WTC Final : सामन्याच्या पहिल्याच दिवशी वरुणराजाची खेळी पाहून ट्विटरवर धम्माल मीम्सचा पाऊस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/19/af9520b0a15c37989b0e32ba0739c5ec_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
WTC Final : सर्वच क्रीडारसिक आणि साऱ्या क्रीडा जगताचं लक्ष लागून राहिलेल्या साउथम्प्टनमधील एजेस बोल स्टेडियमवर पावसानं हजेरी लावली आणि जागतिक कसोटीच्या अंतिम सामन्याचा पहिलाच दिवस वरुणराजानं गाजवला. यामुळं क्रीडारसिकांचा हिरमोड झाला खरा, पण या क्षणांतही त्यांनी आनंदाची वाट शोधलीच. ही वाट चालताना त्यात वाट्याची भूमिका बजावली ती म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या असंख्य मीम्सने.
बीसीसीआयनं सामना सुरु होण्यापूर्वीच पावसाची सुरुवात झाल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं. बस्स, मग काय, अनेकांची कल्पनाशक्ती चाळवली आणि ट्विटरवर सामन्यावर पाणी लोटणाऱ्या या पावसाला अनुसरुन काही मीम्स पोस्ट करण्यास अनेक युजर्सनी सुरुवात केली. या मीम्समध्ये कुठे स्टँडअप कॉमेडियन दिसले, तर कुठे लगानमधील दृश्यांचा संबंध इथं जोडण्यात आला.
मूळच्या खेळपट्टीवर क्रिकेट सामना रंगला नसला तरीही, इथं सोशल मीडियावर मात्र नेटकरी आणि त्यांनी तयार केलेल्या मीम्सनं मात्र एक चांगलीच रंगत आणली होती. त्यामुळं या निमित्तानं का असेना या जागतिक कसोटीच्या अंतिम सामन्याचा पहिला दिवसही क्रिडारसिकांच्या लक्षात राहिला.
All of us are eagerly waiting for #wtc2021 to kick off today.
— Being Singh (@definitely_7not) June 17, 2021
Meanwhile rain in Southampton to everyone: pic.twitter.com/6kg7bIll5K
Everytime, whenever there is an important match in England. 😔Barish hi barish 😫 pic.twitter.com/ZccWbfYgHy
— T Â Ñ M Å Y (@TanmaySonar_007) June 18, 2021
Everyone is exited for the #WTC21
— Rohit 💥 (@sarcasterrk) June 18, 2021
Rain : pic.twitter.com/TgAAtltNw3
#WTC21 to Rain in #Southampton pic.twitter.com/CA2RYfWW0r
— Godman Chikna (@Madan_Chikna) June 18, 2021
Scenes in Southampton considering 🌧️. Rain #INDvsNZ #WTCFinal2021 #Southampton #WTCFinal #WTC21 #FridayThoughts #fridaymorning pic.twitter.com/GGAaHXcmLe
— वि शा ल (@_iamvish) June 18, 2021
दरम्यान, बीसीसीआयने सामन्याच्या एक दिवस आधी अंतिम सामन्यात भाग घेणार्या 11 खेळाडूंची घोषणा केली. अंतिम सामन्यात भारताने तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा आता हे खेळाडू कोण आणि त्यांची कामगिरी नेमकी कशी होते हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणाह आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)