एक्स्प्लोर

टीम इंडियाच्या पूर्वतयारीच्या अभावाने केपटाऊनमध्ये दाणादाण?

दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा दुसरा डाव 135 धावांत गुंडाळून, 72 धावांनी दणदणीत विजय साजरा केला.

केपटाऊन : विराट कोहलीच्या टीम इंडियाला केपटाऊन कसोटीत अखेर लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा दुसरा डाव 135 धावांत गुंडाळून, 72 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. विराट कोहलीच्या लग्नाचा सनई चौघडा इटलीत वाजला, मग दिल्ली आणि मुंबईतल्या रिसेप्शनमध्ये बँडबाजा घुमला आणि भारतीय फलंदाजांची बारात निघाली ती केपटाऊनमध्ये... विजयासाठीचं लक्ष्य केवळ 208 धावांचं होतं. त्यात दक्षिण आफ्रिकेची डेल स्टेन ही मुलुखमैदान तोफही निकामी झाली होती. पण टीम इंडियाची दुसऱ्या डावात दाणादाण उडवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला तीनच वेगवान अस्त्र पुरेशी ठरली. त्यांनी विराटसेनेचा दुसरा डाव अवघ्या 135 धावांत गुंडाळून, टीम इंडियावर 72 धावांनी लाजिरवाणा पराभव लादला. बीसीसीआय आणि टीम इंडियाची पूर्वतयारी अंगलट? तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसाने वाया जाऊनही चौथ्या दिवशीच झालेला हा पराभव इतका बोचरा आहे की, दक्षिण आफ्रिकेचीही दोन्ही डावांत दाणादाण उडाली, असं म्हणून टीम इंडियाची अब्रू झाकता येणार नाही. पण भारतीय फलंदाजांनी केपटाऊनवर एकदा नाही, तर दोनदा घातलेल्या लोटांगणापेक्षाही या पराभवाचं कारण बीसीसीआय आणि टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या दृष्टीने केलेल्या शून्य पूर्वतयारीत दडलं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निघण्याआधी, खरं तर तिथल्या वेगवान आणि बाऊन्सी खेळपट्ट्यांवर धावांची रास कशी उभी करता येईल, या दृष्टीने भारतीय संघाने पूर्वतयारी करणं अपेक्षित होतं. त्यासाठी बीसीसीआयने भारतात किंवा दक्षिण आफ्रिकेत शिबिराची आखणी करायली हवी होती. भारतीय संघाने कसोटी मालिकेआधी दक्षिण आफ्रिकेत सराव सामने खेळणं आवश्यक होतं. पण कर्णधार विराट कोहली लग्न, हनिमून आणि रिसेप्शनमध्ये अडकला आणि बाकीची टीम इंडिया दुबळ्या श्रीलंकेविरुद्धच्या लुटूपुटूच्या वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये व्यस्त राहिली. पण टेलिव्हिजन ब्रॉडकास्टरच्या फायद्यासाठी श्रीलंकेशी खेळून दक्षिण आफ्रिका दौऱ्याची तयारी होणार तरी कशी? असा प्रश्न उरतो. विराट कोहलीची टीम इंडिया सलग नऊ कसोटी मालिका जिंकून दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली होती. पण टीम इंडियाने त्या 9 पैकी सहा कसोटी मालिका मायदेशात, दोन श्रीलंकेत, तर एक वेस्ट इंडिजमध्ये जिंकली होती. भारतात, श्रीलंकेत किंवा विंडीजमध्ये कसोटी मालिका जिंकणं वेगळं आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणं यात फरक आहे, याची बीसीसीआय आणि भारतीय संघव्यवस्थापनाला कल्पना यायला हवी होती. भारतीय संघाला गेल्या 25 वर्षांत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. भारताने दक्षिण आफ्रिकेत 6 पैकी पाच कसोटी मालिकांमध्ये हार स्वीकारली आहे, तर केवळ एकमेव कसोटी मालिका अनिर्णित राखण्यात भारताला यश आलं आहे. या 6 कसोटी मालिकांच्या कालावधीत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकी भूमीवर 17 कसोटी सामन्यांध्ये खेळला. त्यापैकी केवळ दोन कसोटी सामने भारताला जिंकता आले आहेत. हा सारा इतिहास समोर असतानाही, कोणतीही पूर्वतयारी न करता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणं म्हणजे आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखं होतं. केपटाऊनमध्ये तेच घडलं. आता टीम इंडिया सेन्चुरियन आणि जोहान्सबर्गची कसोटी वाचवणार का, हाच प्रश्न आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget