एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऑस्ट्रेलियन ओपनचा सम्राट... नोव्हाक ज्योकोविच
मेलबर्नच्या रॉड लेव्हर अरेनावर सर्बियाच्या नोव्हाक ज्योकोविचनं पुन्हा एकदा ऐतिहासिक यशाला गवसणी घातली. ज्योकोविचनं आठव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आणि ऑस्ट्रेलियन ओपनवर आपली मक्तेदारी पुन्हा एकदा सिद्ध केली.
मेलबर्न : यंदाच्या पहिल्याच ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत ज्योकोविचच्या समोर होता तो ऑस्ट्रियाचा डॉमनिक थिएम. पहिल्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या शोधात असलेल्या थिएमनं सामन्याचा पहिला सेट 4-6 असा गमावला. पण दुसऱ्या आणि तिसरा सेट 6-4, 6-2 असा जिंकून ज्योकोविचसमोर आव्हान निर्माण केलं. पण चौथ्या सेटमध्ये ज्योकोविचनं 6-3 अशी मुसंडी मारली. त्यानंतर पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये ज्योकोविचनं आपला पूर्ण अनुभव पणाला लावून हा सेट 6-4 असा जिंकला आणि हा विजेतेपदही आपल्या नावावर केलं.
आठवं ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद
ज्योकोविचनं गेल्या बारा वर्षात मिळवलेलं हे आठवं ऑस्ट्रेलियन विजेतेपद. ऑस्ट्रेलियन ओपनच्या इतिहासात सर्वाधिक आठ विजेतीपदं जिंकण्याचा विक्रम ज्योकोविचच्याच नावावर आहे. त्यानं 2020 साली वयाच्या 21व्या वर्षी पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर 2011, 2012, 2013, 2015, 2016, 2019 सालीही ज्योकोविचनं जेतेपदाचा मान मिळवला होता. ज्योकोविचनंतर ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सर्वाधिक विजेतीपदांच्या यादीत स्वित्झर्लंडचा महान रॉजर फेडर आणि ऑस्ट्रेलियाचा रॉय एमर्सन प्रत्येकी सहा विजेतीपदांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.
विम्बल्डनला मिळाली नवी राणी, सेरेनाला धूळ चारत सिमोना हालेप विजेती
थिएमचं स्वप्न पुन्हा अधुरं
यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत राफेल नदालला पराभवाचा धक्का देत थिएमनं आपल्या कामगिरीची दखल घ्यायला भाग पाडलं होतं. त्यानंतर अलेक्झांडर झ्वेरेवचं आव्हान मोडीत काढत त्यानं तिसऱ्यांदा ग्रँड स्लॅमची अंतिम फेरी गाठली होती. फ्रेंच ओपनमध्ये गेली दोन वर्ष थिएमला अंतिम फेरी गाठूनही नदालचं आव्हान थोपवता आलं नव्हतं. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपनच्या हार्ड कोर्टवर थिएम विजेतेपदाच्या निर्धारानच उतरला होता. पण 32 वर्षांच्या अनुभवी ज्योकोविचसमोर 26 वर्षांच्या थिएमचा संघर्ष कमी पडला. आणि त्याचं ग्रँड स्लॅम विजेतेपदाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं.
Wimbledon Final : सुपर टायब्रेकरमध्ये नोवाक ज्योकोविचची बाजी, पाचव्यांदा विम्बल्डनचं जेतेपद
ही शर्यत रे अपुली...
ज्योकोविचचं आजवरच्या कारकीर्दीतलं हे सतरावं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं. पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतीपदांच्या यादीत फेडरर आणि नदालनंतर ज्योकोविचचा क्रमांक लागतो. फेडररच्या खात्यात सर्वाधिक 20 तर नदालनं 19 विजेतीपदं पटकावली आहेत.
ज्योकोविचची कोबे ब्रायंटला श्रद्धांजली
विक्रमी विजेतेपद पटकावल्यानंतर प्रतिक्रिया देतेवेळी ज्योकोविचनं महान बास्केटबॉलपटू कोबे ब्रायन्टला श्रद्धांजली वाहिली. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सुरु असतानाच गेली दहा वर्ष ज्योकोविचचा चांगला मित्र आणि मेंटॉर असलेल्या कोबे ब्रायन्ट आणि त्याच्या मुलीचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी अंत झाला होता.
Sachin Tendulkar | नवी मुंबईत 'तेंडुलकर मिडलसेक्स'ची क्रिकेट अॅकॅडमी | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement