एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विम्बल्डनला मिळाली नवी राणी, सेरेनाला धूळ चारत सिमोना हालेप विजेती
रोमानियाच्या या सातव्या मानांकित टेनिसपटूने अमेरिकेच्या अकराव्या मानांकित सेरेना विल्यम्सचा 6-2, 6-2 असा धुव्वा उडवला आणि पहिल्यावहिल्या विम्बल्डन विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे.
लंडन : विम्बल्डनला नवी राणी मिळाली आहे. तिचं नाव आगे सिमोना हालेप. रोमानियाच्या या सातव्या मानांकित टेनिसपटूने अमेरिकेच्या अकराव्या मानांकित सेरेना विल्यम्सचा 6-2, 6-2 असा धुव्वा उडवला आणि पहिल्यावहिल्या विम्बल्डन विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे.
सिमोना हालेपच्या कारकीर्दीतले हे दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरले आहे. तिने गेल्या वर्षी फ्रेन्च ओपनचे विजेतेपद पटकावले होते. सिमोनाने यंदा विम्बल्डनचे विजेतेपद आपल्या खजिन्यात जमा केले आहे. त्यामुळे सेरेना विल्यम्सची मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक 24 ग्रँड स्लॅम विजेतीपदांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी हुकली आहे. सेरेनाच्या खात्यात आजवर 23 ग्रँड स्लॅम विजेतीपदं जमा आहेत.
Hail Halep 🇷🇴
The Romanian becomes our new champion after defeating Serena Williams 6-2, 6-2 with a magical performance #Wimbledon | #JoinTheStory pic.twitter.com/wkKcGAl1Ny — Wimbledon (@Wimbledon) July 13, 2019
No words can describe this feeling! @Wimbledon ❤️💪🌱🍓🙌 pic.twitter.com/f5VFvDnktk
— Simona Halep (@Simona_Halep) July 11, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement