एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Wimbledon Final : सुपर टायब्रेकरमध्ये नोवाक ज्योकोविचची बाजी, पाचव्यांदा विम्बल्डनचं जेतेपद

ज्योकोविच आणि फेडररमधलाहा सामना तब्बल 4 तास 57 मिनिटं रंगला होता. विम्बल्डनच्या इतिहासातील हा सर्वात मोठा अंतिम सामना आहे. 2008 मध्ये रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यात झालेल्या सामन्यापेक्षा हा सामना 9 मिनिटं जास्त रंगला होता.

लंडन : सर्बियाच्या नंबर वन नोवाक ज्योकोविचने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचं आव्हान मोडून काढलं आणि कारकीर्दीत सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनचं विजेतेपद पटकावलं. त्याने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत फेडररचं आव्हान 7-6, 1-6, 7-6, 4-6, 13-12 असं मोडून काढलं. त्याने पाचवा आणि निर्णायक सेट सुपर टायब्रेकरमध्ये जिंकला. ज्योकोविचचं आजवरच्या कारकीर्दीतलं हे विम्बल्डनचं पाचवं आणि सोळावं ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद ठरलं. तर दुसरीकडे दोन चॅम्पियनशिप पॉईंट गमावल्यामुळे फेडररचं नवव्या विम्बल्डन विजेतेपदाचं स्वप्न थोडक्यात हुकलं. ज्योकोविच आणि फेडररमधलाहा सामना तब्बल 4 तास 57 मिनिटं रंगला होता. विम्बल्डनच्या इतिहासातील हा सर्वात मोठा अंतिम सामना आहे. 2008 मध्ये रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यात झालेल्या सामन्यापेक्षा हा सामना 9 मिनिटं जास्त रंगला होता. या दोन दिग्गज खेळाडूंमधील पहिला सेट अतिशय रोमांचक होता. दोन्ही खेळाडूंनी 6-6 पॉईंटपर्यंत आपली सर्व्हिस कायम ठेवला. पहिल्या सेटचा निर्णय टायब्रेकरमध्ये गेला आणि ज्योकोविचने बाजी मारत हा सेट 7-6 ने आपल्या नावावर केला. पहिला सेट गमावल्यानंतर फेडररने शानदार कमबॅक केलं आणि पुढील सेटमध्ये दमदार कामगिरी केली. त्याने हा सेट एकतप्फे 6-1 ने जिंकत सामन्यात बरोबरी केली. ज्योकोविच तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा एकदा लयीत दिसला आणि त्याने चांगली कामगिरी केली. दोन्ही खेळाडूंनी या सेटमध्ये आपापली सर्व्हिस कायम ठेवला आणि या सेटचा निर्णयही टायब्रेकरमध्ये गेला. टायब्रेकरमध्ये पुन्हा एकदा ज्योकोविचचं पारडं जड ठरलं आणि त्याने हा सेट 7-4 ने आपल्या नावावर केला. 1-2 ने मागे पडल्यानंतर फेडररने चौथ्या सेटमध्ये पुनरागमन केलं आणि बघता-बघता 5-2ने आघाडी घेतली. यानंतर ज्योकोविचने कमबॅकचा प्रयत्न केला आणि पुढील दोन गेम जिंकले. पण फेडररने दहावा गेम जिंकून सेटवर 6-4 ने कब्जा केल. परिणामी सामना 2-2 ने बरोबरीत आला. निर्णायक सेटमध्ये ज्योकोविचने सहाव्या गेममध्ये फेडररची सर्व्हिस भेदून सेटमध्ये 4-2 अशी आघाडी घेतली. पण फेडररने पुढील दोन गेममध्ये ज्योकोविचची सर्व्हिस भेदली आणि स्कोअर 3-4 केला. फेडररने पुढच्या गेममध्ये सर्व्हिस कायम ठेवत स्कोअर 4-4 असा समान केला. यानंतर ज्योकोविचने नववा गेम जिंकून सामन्यात 5-4 अशी आघाडी घेतली. फेडररने 15व्या गेममध्ये ज्योकोविचची सर्व्हिस भेदून 8-7 अशी आघाडी घेतली. पण ज्योकोविचने पुढच्याच गेममध्ये त्याची सर्व्हिस निष्प्रभ करत 8-8 ने बरोबरी केली. त्याने या गेममध्ये दोन चॅम्पियनशिप पॉईंट वाचवले. नव्या नियमानुसार 12-12 च्या स्कोअरवर सुपर टायब्रेकर घेण्यात आला आणि त्यात ज्योकोविचने बाजी मारत विजेतेपदावर नाव कोरलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRatnagiti Weather : रत्नागिरीत धुकेच धुके... सोबत कमालीचा गारठाDhananjay Chandrachud : संजय राऊतांच्या आरोपांवर चंद्रचूड यांचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Bollywood Actor Life: जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Embed widget