एक्स्प्लोर

NZ vs SA Semifinal T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’; न्यूझीलंडची टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक; फिन अ‍ॅलनने ठोकले रेकॉर्डब्रेक शतक

NZ beat SA SemiFinal T20 World Cup : कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून धुव्वा उडवला.

New Zealand beat South Africa Semi Final T20 World Cup 2026 : कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून धुव्वा उडवला. या विजयासह न्यूझीलंडने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली होती, परंतु बाद फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यात पुन्हा एकदा त्यांच्या पदरी निराशाच पडली. पण मोक्याच्या क्षणी कच खाण्याच्या सवयीमुळे चोकर्स हा शिक्का पुसण्यात दक्षिण आफ्रिकेला पुन्हा एकदा अपयश आले असून त्यांचे विश्वचषकाचे स्वप्न भंगले आहे.

दक्षिण आफ्रिकेची धक्कादायक सुरुवात 

उपांत्य फेरीत नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. डावाच्या दुसऱ्याच षटकात कोल मॅककॉन्चीने दक्षिण आफ्रिकेला सलग दोन धक्के दिले. आधी त्याने क्विंटन डी कॉकला 8 चेंडूत 10 धावांवर बाद केले. त्यानंतर लगेचच पुढील चेंडूवर रायन रिकेल्टनला शून्यावर माघारी पाठवत मॅककॉन्चीने आफ्रिकेची अवस्था बिकट केली. 55 धावांवर कर्णधार एडन मार्कराम (20 चेंडूत 18 धावा) रचिन रवींद्रच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि तिसरा मोठा धक्का बसला. त्यानंतर 10वे आणि 11वे षटक आफ्रिकेसाठी आणखी घातक ठरले. रचिन रवींद्रने डेव्हिड मिलरला अवघ्या 6 धावांवर बाद केले, तर पुढील षटकात कोल मॅककॉन्चीने सेट फलंदाज डेवाल्ड ब्रेविसला 27 चेंडूत 34 धावांवर माघारी धाडले.  

77 धावांवर पाच विकेट्स, नंतर मार्को यानसेनचा 'शो'

77 धावांवर पाच विकेट्स पडल्यावर ट्रिस्टन स्टब्स आणि मार्को यानसेन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाला स्थिरता दिली. मात्र 150 धावांवर लॉकी फर्ग्युसनने स्टब्सला 29 धावांवर बाद करत भागीदारी मोडली. एकीकडे विकेट्स पडत असताना मार्को यानसेन शेवटपर्यंत खंबीरपणे उभा राहिला. त्याने अवघ्या 30 चेंडूत नाबाद 55 धावांची झंझावाती खेळी करत संघाचा डाव 169 धावांपर्यंत नेला. यानसेनच्या खेळीत 2 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री, कोल मॅककॉन्ची आणि रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या, तर जिमी नीशम आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी एक यश मिळवले.

फिन अ‍ॅलनने ठोकले शतक; न्यूझीलंडने थेट फायनलमध्ये मारली धडक  

दक्षिण आफ्रिकेने 169 धावांचा आव्हानात्मक स्कोअर उभारला. मात्र हे लक्ष्य न्यूझीलंडसाठी काहीच कठीण ठरले नाही. कीवी संघाने अवघ्या 12.5 षटकांत 173 धावा करत सामना 9 विकेट्सनी जिंकला आणि फायनलचे तिकीट पक्के केले. या विजयाचा खरा नायक ठरला फिन अ‍ॅलन. अ‍ॅलनने अवघ्या 33 चेंडूत शतक झळकावत टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतकाची नोंद केली. त्याच्या आक्रमक फलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज पूर्णपणे हतबल झाले. न्यूझीलंडच्या या दणदणीत विजयाने संपूर्ण क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. आता कीवी संघ अंतिम फेरीत कोणाशी भिडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा -

IND vs ENG T20 World Cup Semi Final : ईशान अन् संजू  सलामीवीर, तर अभिषेक OUT? इंग्लंडविरुद्ध अशी असणार टीम इंडियाची Playing-11, कोच स्पष्टच बोलला

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

KKR vs RR IPL 2026 : अखेर वनवास संपला! सलग पराभवांच्या अंधारानंतर रिंकू सिंगने पेटवला केकेआरच्या विजयाचा दिवा; शेवटच्या 5 षटकात गेमच फिरवला
अखेर वनवास संपला! सलग पराभवांच्या अंधारानंतर रिंकू सिंगने पेटवला केकेआरच्या विजयाचा दिवा; शेवटच्या 5 षटकात गेमच फिरवला
KKR vs RR IPL 2026 : ईडन गार्डन्सवर रिंकू-अनुकूलचे वादळ! राजस्थान रॉयल्सला धूळ चारत केकेआरचा हंगामातील पहिला विजय
ईडन गार्डन्सवर रिंकू-अनुकूलचे वादळ! राजस्थान रॉयल्सला धूळ चारत केकेआरचा हंगामातील पहिला विजय
PBKS vs LSG Live Score IPL 2026 : लखनऊने जिंकली नाणेफेक; पंजाबला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण, जाणून घ्या LIVE अपडेट्स
PBKS vs LSG Live Update : लखनऊने जिंकली नाणेफेक; पंजाबला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Ayush Mhatre Injury : CSK चा 'हुकूमी एक्का' बाहेर, आयुष म्हात्रेच्या दुखापतीचा रिपोर्ट आला समोर, ज्याने रातोरात समीकरणं बदलली, नेमकं काय घडलं?
CSK चा 'हुकूमी एक्का' बाहेर, आयुष म्हात्रेच्या दुखापतीचा रिपोर्ट आला समोर, ज्याने रातोरात समीकरणं बदलली, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
Embed widget