एक्स्प्लोर
'टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी अद्याप रवी शास्त्रींची निवड नाही'
नवी दिल्ली : टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाबद्दल कोणताच निर्णय झालेला नाही, असं सांगत बीसीसीआयने सर्वांनाच बुचकळ्यात पाडलं आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची निवड झाल्याचं वृत्त दुपारी 4.30 वाजल्यापासून प्रसारमाध्यमांनी दाखवलं होतं.
रवी शास्त्री यांची अजूनही टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली नसल्याचा खुलासा बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी केला आहे. क्रिकेट सल्लागार समिती यावर विचारमंथन करत असल्याचं चौधरींनी सांगितलं. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाबाबतचा निर्णय रात्री उशिरापर्यंत होईल, असंही त्यांनी सांगितलं.
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकांची नियुक्ती करण्याचा अधिकार बीसीसीआयनं सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीकडे सोपवला आहे. या समितीनं अजूनही अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचं चौधरी यांनी स्पष्ट केलं.
भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यापासून रवी शास्त्री ही जबाबदारी स्वीकारतील, असं वृत्त पसरलं होतं. 2019 पर्यंतच्या विश्वचषकापर्यंत रवी शास्त्रींकडे टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा असल्याचं म्हटलं जात होतं. वीरेंद्र सेहवाग आणि टॉम मूडी यांच्या नावाची सुरुवातीला चर्चा होती. मात्र रवी शास्त्री यांनीच बाजी मारल्याचं म्हटलं गेलं.
टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या दोघांशीही रवी शास्त्री यांचे चांगले संबंध आहेत. ऑगस्ट 2014 ते जून 2016 या काळात टीम इंडियाचे संचालक म्हणून रवी शास्त्री यांनी काम पाहिलं होतं. त्यामुळे त्यांच्या निवडीवर फारसं आश्चर्य व्यक्त झालं नाही.
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री, टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सहवाग, इंग्लंडचे क्रिकेटर रिचर्ड पायबस, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि श्रीलंकेचे माजी कोच टॉम मुडी आणि सध्याचे अफगाणिस्तान क्रिकेट टीमचे कोच लालचंद राजपूत यांनी मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement