एक्स्प्लोर
Advertisement
ऐतिहासिक विजयाने निरोप, मॉर्केलचा क्रिकेटला अलविदा
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा जोहान्सबर्ग कसोटी सामना मॉर्केलच्या कारकीर्दीतला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर 492 धावांनी मात करत मॉर्केलला विजयी निरोप दिला.
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा जोहान्सबर्ग कसोटी सामना मॉर्केलच्या कारकीर्दीतला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर 492 धावांनी मात करत मॉर्केलला विजयी निरोप दिला.
मॉर्केलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या केपटाऊनच्या तिसऱ्या कसोटीत एक मोठा विक्रमही केला. त्याने पहिल्या डावात चार विकेट घेतल्या आणि यासोबतच कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्याचा समावेश झाला. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा मॉर्केलची कसोटीतील पहिली विकेट होती.
मॉर्केलने आजवरच्या कारकीर्दीत 86 कसोटी, 117 वन डे आणि 44 ट्वेन्टी ट्वेन्टी सामंन्यांत दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं होतं. 288 आंतरराष्ट्रीय सामन्यात मॉर्केलच्या नावावर 544 विकेट्स जमा आहेत. कसोटीत 306, वन डेमध्ये 188 आणि टी-20 मध्ये त्याने 47 फलंदाजांना माघारी धाडलं.
या कसोटी मालिकेपूर्वीच मॉर्केलने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. ''मी आत्ताच कौटुंबीक आयुष्याला सुरुवात केली आहे. माझी पत्नीही दुसऱ्या देशात आहे. आमचं सध्याचं शेड्युल पाहता कुटुंबासाठी वेळ काढणं अत्यंत कठीण आहे. त्यामुळे निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे,'' असं मॉर्केल म्हणाला होता.
''मी दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीमध्ये क्रिकेटच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. त्यामुळे माझे सहकारी, क्रिकेट दक्षिण आफ्रिका आणि कुटुंबीयांसाठी नेहमी हजर असेल. माझ्यामध्ये अजूनही बरंच क्रिकेट बाकी आहे,'' असं तो म्हणाला होता.
दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये मॉर्ने मॉर्केल खेळताना दिसणार नाही. कारण, या लिलावात त्याच्यावर एकाही फ्रँचायझीने बोली लावली नव्हती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement