(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुवाहाटी वनडे : भारताकडून विडींजचा 8 विकेट्सने धुव्वा
विंडीजनं दिलेलं 323 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियानं 42.1 षटकांत पार केलं. पाच सामन्याच्या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
गुवाहाटी : विराट कोहली आणि रोहित शर्माच्या दमदार शतकांच्या जोरावर टीम इंडियानं गुवाहाटी वन डेत विंडीजचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. विंडीजनं दिलेलं 323 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियानं 42.1 षटकांत पार केलं. पाच सामन्याच्या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
विराट कोहलीनं कर्णधाराला साजेशी खेळी करताना 107 चेंडूत 140 धावांची खेळी केली. त्यात 21 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. रोहित शर्मानंही आपल्या वन डे कारकीर्दीतलं 20वं शतक साजरं केलं. त्यानं 117 चेंडूत 152 धावांची नाबाद खेळी केली. त्यात 15 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. या दोघांनी दुसऱ्या विकेसाठी 246 धावांची भागीदारी रचली.
टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरूवात खराब झाली. मात्र शिमरॉन हेतमायरनं झळकावलेल्या शतकी खेळीमुळे वेस्ट इंडिजनं गुवाहाटीच्या पहिल्या वन डेत भारतासमोर 323 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
विंडीजचा मधल्या फळीतील फलंदाज शिमरॉन हेतमायरनं आपल्या कारकीर्दीतलं तिसरं शतक साजरं केलं. त्याने 78 चेंडूत सहा चौकार आणि सहा षटकारांसह 106 धावांची खेळी उभारली. सलामीवीर कायरन पॉवेलनही 39 चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांसह 51 धावांचं योगदान दिलं.
भारताकडून लेग स्पिनर यजुवेंद्र चहलनं सर्वाधिक तीन फलंदाजांना माघारी धाडलं. मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजानं प्रत्येकी दोन तर खलील अहमद एक विकेट घेतली.
संबधित बातम्या
गुवाहाटी वनडे : विराट-रोहितनं साजरं केलं शतक