PKL 2021: प्रो कबड्डी लीगमधील 'हे' विक्रम मोडणं जरा कठिणच!
Pro Kabaddi League 2021: प्रो कब्बडी लीगचा पहिला हंगाम 2014 मध्ये पार पडला होता. मात्र, त्यावेळी या लीगला खूप कमी प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता.
Pro Kabaddi League 2021: प्रो कब्बडी लीगचा पहिला हंगाम 2014 मध्ये पार पडला होता. मात्र, त्यावेळी या लीगला खूप कमी प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. मात्र, आता या लीगची लोकप्रियता वाढू लागलीय. प्रो कबड्डी लीगमधील खेळाडूंची अविश्वसनीय कामगिरी, काही उत्कृष्ट रेकॉर्ड आणि खेळाचे सोपे नियम याचं मुख्य कारण ठरतंय. 40 मिनिटांत संघाचा विजय निश्चित करणाऱ्या या खेळाचा आठवा हंगाम सुरु आहे. प्रो कबड्डी लीगमध्ये खेळल्या गेलेल्या 7 हंगामात आतापर्यंत असे अनेक विक्रम केले गेले आहेत जे मोडणे जरा कठीणचं आहेत. पीकेएलमधील असे पाच विक्रम आहे, ज्यांना मोडण्यासाठी खेळाडूंना खूप संघर्ष करावा लागणार आहे.
एका सामन्यात सर्वाधिक गुण
पीकेएलच्या सातव्या हंगामात हरियाणाचा सामना बंगळुरूशी झाला. या सामन्यात पवन सेहरावतेनं 39 गुण मिळवले होते. एका सामन्यात आतापर्यंत कोणत्याही रेडरला इतके गुण मिळाले नाहीत. यापूर्वी प्रदीप नरवालच्या नावावर सर्वाधिक गुण मिळवल्याचा विक्रम होता. त्यानं पीकेएल पाचव्या हंगामात हरियाणाविरुद्ध 34 गुण मिळवले होते. हा विक्रम मोडणे कदाचित खूप कठीण आहे.
एका हंगामात सर्वाधिक अंक
प्रो कबड्डीच्या पाचव्या हंगामात परदीप नरवालनं ऐतिहासिक कामगिरी करून सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानं पाचव्या हंगामात 369 गुण मिळवले होते. यामुळं एका हंगामात सर्वाधिक गुण मिळवणारा तो एकमेव खेळाडू ठरला होता. पवन सेहरावतनं 346 अंक प्राप्त करून या विक्रमाच्या जवळ पोहचला होता. परंतु, हे विक्रम मोडण्यासाठी त्याला 24 अंक कमी पडले.
एका हंगामात सर्वाधिक टॅकल
प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामात यूपीच्या नितेश कुमारनं 100 टॅकल पॉईंट्स मिळवून इतिहास रचला होता. त्याच्याशिवाय, आजपर्यंत कोणालाही एकाच हंगामात 90 टॅकल पॉइंट्स देखील गाठता आलेले नाहीत. या यादीत परवेश भैंसवाल (86) दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, फजल अत्राचली (83) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
एका रेडमध्ये सर्वाधिक गुण
परदीप नरवालनं प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या हंगामात हरियाणा विरुद्ध एका रेडमध्ये सर्वाधिक 8 गुण मिळवून इतिहास रचला होता. त्यानंतर पीकेएलच्या सातव्या हंगामात बंगाल विरुद्ध एकाच रेडमध्ये परदीप नरवालनं एकाच रेडमध्ये पाच जणांना बाद करून 6 गुण मिळवण्यात यशस्वी ठरला होता.
एकाच हंगामात सर्वाधिक सुपर 10
प्रो कबड्डीच्या सहाव्या हंगामात आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या नवीन कुमारला काही खास कामगिरी करता आली नाही. मात्र, सातव्या हंगामात त्यानं उष्कृष्ट कामगिरीच्या जोरावर नव्या विक्रमाला गवसणी घातली. त्यानं एका हंगामात तब्बल 22 वेळा सर्वाधिक सुपर 10 रेड केली होती. या यादीत परदीप नरवाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 19 सुपर 10 रेड करण्याच्या विक्रमाची नोंद आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- Pro Kabaddi League 2021 : दबंग दिल्ली विरुद्ध गुजरात जायंट्स सामना बरोबरीत, तर बंगळुरू बुल्सचा बंगाल वॉरियर्सवर विजय
- Pro Kabaddi League 2021: मुंबई दिल्लीशी आणि बंगाल गुजरातशी भिडणार; तामिळनाडू-बंगळुरू यांच्यातही आज रंगणार सामना, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार तीन मोठे सामने?
- Pro Kabaddi League 2021 : अटीतटीच्या सामन्यात पुणेरी पलटणचा तेलुगू टायटन्सवर; तर पिंक पँथरचा हरयाणा स्टीलर्सवर विजय