Pro Kabaddi League 2021 : अटीतटीच्या सामन्यात पुणेरी पलटणचा तेलुगू टायटन्सवर; तर पिंक पँथरचा हरयाणा स्टीलर्सवर विजय
Pro Kabaddi League 2021 : शनिवारी दिवसभरात प्रो कबड्डी लीगमध्ये तीन सामने झाले. ज्यात पाटणा पायरेट्स, पुणेरी पलटन आणि पिंक पँथर या संघानी विजय मिळवला.
Pro Kabaddi League 2021 : प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League 2021) यंदाच्या पर्वाला सुरुवात झाली असून यंदाचे सामने अत्यंत चुरशीचे होताना दिसत आहेत. शनिवारी दिवसभरात झालेले तिनही सामने अत्यंत अटीतटीचे झाले. ज्यात सर्वात आधी पाटणा पायरेट्सला (Patna Pirates) विरुद्ध यूपी योद्धा (UP Yoddha) संघाने अगदी एका पॉईंटच्या फरकाने मात दिली. त्यानंतर पुणेरी पलटणच्या संघाने तेलुगू टायटन्सवर आणि पिंक पँथरनी हरयाणा स्टीलर्सवर विजय मिळवला.
प्रो कबड्डी लीगच्या आठवा हंगामाच्या शनिवारच्या सामन्यांमधील दुसरा सामना पहिल्या सामन्याप्रमाणे चुरशीचाच झाला. ज्यामध्ये शेवटच्या काही क्षणात खेळ बदलला आणि पुणेरी पलटणने 34-33 च्या फरकाने तेलुगु टायटन्सला मात (Puneri Paltan Beat Telgu Taitans) दिली. टायटन्सचा संघ पराभूत झाला असला तरी त्यांच्या सिद्धार्थ देसाईला 15 गुणांणुळे सुपर रेडर होण्याचा मान मिळाला.
दिवसाच्या अखेरच्या सामन्यात पिंक पँथरनी हरयाणा स्टीलर्सवर विजय (d Pink Panther beats Haryana Steeler) मिळवला. या सामन्यातही दोन्ही संघानी उत्तम खेळ दाखवला. दर रेडनंतर चुरस वाढत होती. दोन्ही संघाचे रेडर गुण खिशात घालत होते. पण अखेर पिंक पँथरनी हरयाणा स्टीलर्सपेक्षा दोन गुण अधिक मिळवत 40-38 च्या फरकाने सामना जिंकला.
हे ही वाचा -
- Pro Kabaddi League 2021 : चुरशीच्या सामन्यात युपी योद्धा संघ विजयी, पाटणा पायरेट्सला एका पॉईंटने दिली मात
- PKL 2021: प्रो कबड्डी लीगला 22 डिसेंबरपासून सुरुवात; कोणत्या संघानं जिंकली सर्वाधिक विजेतेपदे? पाहा यादी
- Pro Kabaddi League : अभिषेक बच्चनच्या जयपुर पिंक पँथर्सला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का, गुजरात जायंट्सची बाजी
- Pro Kabaddi League : रोमाचंक सामन्यात दबंग दिल्लीची पुणेरी पलटणवर मात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha