Pro Kabaddi League 2021 : दबंग दिल्ली विरुद्ध गुजरात जायंट्स सामना बरोबरीत, तर बंगळुरू बुल्सचा बंगाल वॉरियर्सवर विजय
Pro Kabaddi League 2021 : रविवारी दिवसभरात प्रो कबड्डी लीगमध्ये दोन सामने झाले. ज्यात एक सामना बरोबरीत सुटला तर दुसरा सामनाही अत्यंत चुरशीत पार पडला.
Pro Kabaddi League 2021 : प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League 2021) यंदाच्या पर्वाला सुरुवात झाली असून यंदाचे सामने अत्यंत चुरशीचे होताना दिसत आहेत. रविवारी दिवसभरात झालेले दोनही सामने अत्यंत अटीतटीचे झाले. ज्यात सर्वात आधी दबंग दिल्ली विरुद्ध गुजरात जायंट्स हा सामना बरोबरीत सुटला. तर बंगळुरू बुल्सने बंगाल वॉरियर्सवर विजय मिळवला.
रविवारी पहिला झालेला सामना गुजरात जायंट्स विरूद्ध दबंग दिल्ली असा झाला. अगदी अखेरपर्यंत अतिशय अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात कोणता संघ जिंकेल हे सांगता येत नव्हते. अखेर हा सामना अनिर्णीत सुटला. दिल्लीकडून नवीन कुमारने दमदार खेळ दाखवला. त्याने सर्वाधिक 11 पॉईंट्स पटकवले. त्यामुळेच सामन्यात त्याला सुपर रेडरचा पुरस्कार देण्यात आला. त्याने 8 रेड पॉईंट्स आणि 3 बोनस पॉईंट्स मिळवले.
दिवसातील दुसरा आणि शेवटचा सामना बंगळुरू बुल्स आणि बंगाल वॉरियर्सचा यांच्यात पार पडला. पहिल्या हाफमध्ये बंगाल वॉरियर्सने 12-3 ची आघाडी घेतली होती. पण नंतर बंगळुरू बुल्सने जोरदार आघाडी घेतली. अखेरपर्यंतच चुरशीचा झालेला हा सामना बंगळुरु बुल्सने 36-35 अशा फरकाने खिशात घातला वॉरियर्सचा मनिंदर सिंग 19 गुणांसह या सामन्याचा सुपर रेडर ठरला.
हे ही वाचा -
- Pro Kabaddi League 2021 : चुरशीच्या सामन्यात युपी योद्धा संघ विजयी, पाटणा पायरेट्सला एका पॉईंटने दिली मात
- PKL 2021: प्रो कबड्डी लीगला 22 डिसेंबरपासून सुरुवात; कोणत्या संघानं जिंकली सर्वाधिक विजेतेपदे? पाहा यादी
- Pro Kabaddi League : अभिषेक बच्चनच्या जयपुर पिंक पँथर्सला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का, गुजरात जायंट्सची बाजी
- Pro Kabaddi League : रोमाचंक सामन्यात दबंग दिल्लीची पुणेरी पलटणवर मात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha