IPL 2020: गुणतालिकेत तळाला असलेल्या पंजाबच्या केएल राहुलची ऑरेंज कॅपवरील पकड कायम; पर्पल कॅप कोणाकडे?
IPL 2020: रविवारी खेळल्या जाणाऱ्या डबल हेडरनंतर पॉइंट्स टेबल आणि पर्पल रंगाच्या कॅपच्या स्थितीत थोडा बदल होऊ शकतो.
इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रात किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ गुणतालीकेत तळाला गेला आहे. परंतु, कर्णधार के एल राहुलने आपला शानदार फॉर्म कायम ठेवला आहे. शनिवारी डबल हेडर खेळल्यानंतरही केएल राहुलने ऑरेंज कॅप कायम ठेवली आहे. पर्पल रंगाच्या कॅपच्या मालकामध्येही बदल झालेला नाही. दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज रबाडाने पर्पल रंगाची कॅप कायम राखली आहे.
केकेआर विरुद्ध केएल राहुलने 74 धावांची शानदार खेळी खेळली. मात्र, राहुलला आपल्या संघाला जिंकून देता आलं नाही. पंजाबने आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यांमधून राहुलने 387 धावा जमवल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या संघाने सात सामन्यांत सहा सामने गमावले असून केवळ एक सामना जिंकला आहे.
IPL 2020 : विराटचा नवा विक्रम, रोहित, सुरेश रैनाची केली बरोबरी
दुसर्या क्रमांकावर राहुलचा साथीदार मयांक अग्रवाल आहे. त्याने सात सामन्यांत 337 धावा केल्या आहेत. मयांकने चेन्नई सुपर किंग्जच्या फाफ डु प्लेसिसला दुसर्या स्थानावरून दूर केले.
दिल्ली कॅपिटलस टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे, त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण 15 विकेट्स घेणाऱ्या रबाडाचाही यात महत्त्वाची भूमिका आहे. गेल्या आयपीएलमध्ये रबाडाने 12 सामन्यात 25 बळी घेतले होते. दुसर्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह असून त्याने 11 गडी बाद केले आहेत. बुमराहसह प्लेयर ट्रेंट बोल्ट 10 विकेटसह पर्पल कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पॉईंट टेबलविषयी सांगायचं म्हटलं तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ सर्वाधिक पाच सामने जिंकून प्रथम स्थानावर आहे, तर मुंबई इंडियन्स दुसर्या क्रमांकावर आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब व्यतिरिक्त राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी प्ले ऑफची शर्यत कठीण झाली आहे. हे तीन संघ पॉइंट टेबलच्या तळाशी आहेत.