IPL 2024 : श्रेयस अय्यर फॉर्मात परतला, IPL आधी केकेआरची चिंता मिटली
Shreyas Iyer In Ranji Trophy Final : आयपीएलच्या रनसंग्रामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. कोलकात्याचा पहिल सामना 23 मार्च रोजी होणार आहे.
Shreyas Iyer In Ranji Trophy Final : आयपीएलच्या रनसंग्रामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. कोलकात्याचा पहिल सामना 23 मार्च रोजी होणार आहे. त्याआधी कोलकात्याची मोठी चिंता मिटली आहे. कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यर फॉर्मात परतला आहे. वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या रणजी चषकाच्या फायनलमध्ये श्रेयस अय्यर यानं वादळी खेळी केली. अय्यर फॉर्मात परतल्यामुळे कोलकात्याच्या चमूमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विदर्भाविरोधात श्रेयस अय्यरनं 95 धावांची झंझावती खेळी केली.
वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि विदर्भ यांच्यात रणजी चषकाची फायनल सुरु आहे. मुंबईने दुसऱ्या डावात 418 धावांचा डोंगर उभारत विदर्भापुढे 538 धावांचे विराट आव्हान ठेवलेय. मुंबईकडून युवा मुशीर खान यानं शानदर शतक ठोकले. त्याशिवाय अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांनी झंझावती फलंदाजी केली. श्रेयस अय्यरने 111 चेंडूमध्ये 95 धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरचं शतक थोडक्यात हुकलं. आपल्या या खेळीमध्ये श्रेयस अय्यरने 10 चौकार आणि तीन षटकार ठोकले. मुंबईची अवस्था अतिशय खराब होती, त्यावेळी अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांनी शानदार खेळी करत डाव सावरला. आयपीएल 2024 आधी श्रेयस अय्यर फॉर्मात परतला, त्यामुळे कोलकात्याची चिंता मिटली आहे.
कोलकाता नाइट रायडर्ससाठी दिलासादायक -
आयपीएलमध्ये श्रेयस अय्यर हा कोलकात्याचा कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. पण गेल्या काही दिवसांपसून श्रेयस अय्यर खराब फॉर्मात होता. त्याच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. त्यामुळे त्याला टीम इंडियातून स्थान गमावावं लागलं होतं. पण आता आयपीएलआधी तो फॉर्मात परतला आहे. कोलकाता आपला पहिला सामना 23 मार्च रोजी हैदराबादविरोधात होणार आहे. आयपीएलचा रनसंग्राम 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे.
श्रेयस अय्यरचं आयपीएलमधील करियर -
श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये 101 सामने खेळले आहेत. कोलकातआधी तो दिल्ली संघाचा सदस्य होता. अय्यरने आयपीएलमध्ये 126 च्या स्ट्राईक रेटने आणि 32 च्या सरासरीने 2776 धावा चोपल्या आहे. अय्यरनं आयपीएलमध्ये 19 अर्धशतकं ठोकली आहेत. त्याने 237 चौकर आणि 99 षटकार लगावलेत.
पहिल्या टप्प्यात कोलकात्याचे तीन सामने -
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, 23 मार्च, कोलकाता, संध्याकाळी 7.30 वाजता
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 29 मार्च, बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजता
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 3 एप्रिल, वायझॅग, संध्याकाळी 7.30 वाजता
Kolkata Knight Riders Players: कोलकात्याचे नाईट रायडर्स कोण कोण ?
आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, हर्षित राणा, फिलीप सॉल्ट, नीतीश राणा, रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, सुनील नरेन, सुयश शर्मा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर, मिचेल स्टार्क, मुजीब रहमान, शरफन रुदरफोर्ड, गस अॅटकिन्सन, चेतन साकरिया, केएस भरत, मनिष पांडे, अंगक्रिश रघुवंशी, रमनदीप सिंह, शाकीब हुसेन
Kolkata Knight Riders Players: Andre Russell, Anukul Roy, Harshit Rana, F Salt, Nitish Rana, Rahmanullah Gurbaz , Rinku Singh, Shreyas Iyer, Sunil Narine, Suyash Sharma, Vaibhav Arora, Varun Chakaravarthy, Venkatesh Iyer, Mitchell Starc, Chetan Sakariya, Gus Atkinson, Sherfane Rutherford, Mujeeb Rahman, Angkrish Raghuvanshi, Manish Pandey, K.S. Bharat, Ramandeep Singh, Sakib Hussain