IPL 2024 Virat Kohli: 'संघाला तुमच्याकडून ही अपेक्षा नाही...'; कोहलीने अर्धशतक झळकावले, तरीही सुनील गावसकर संतापले!
IPL 2024 RCB vs SRH Virat Kohli: हैदराबादविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 37 चेंडूत अर्धशतक झळकावले. या काळात त्याने 4 चौकार आणि एक षटकार मारला.
IPL 2024 RCB vs SRH: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने IPL 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा 35 धावांनी पराभव करून दुसरा विजय नोंदवला. विराट कोहली (Virat Kohli) आणि रजत पाटीदार यांच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीमुळे आरसीबीने हैदराबादचा त्यांच्याच घरात पराभव केला. या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक केले. पण त्याचा स्ट्राईक रेट 120 पेक्षा कमी होता. विराट कोहलीच्या या संथ खेळीमुळे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सुनील गावसकर म्हणाले, मधल्या षटकांमध्ये विराट कोहलीने आपली लय गमावल्याचे दिसत होते. 31-32 धावांवर असताना सुमारास तो आऊट होईल असे वाटत होते. त्याने एकही चौकार मारला नाही. तुम्ही डावाच्या पहिल्या चेंडूपासून स्ट्राइक घेता आणि 14-15 षटकांत बाद झालात आणि तुमचा स्ट्राइक रेट 118 आहे. संघाला तुमच्याकडून ही अपेक्षा नाही, असं सुनील गावसकर यांनी सांगितले. एकेरी, एकेरी आणि एकेरी धावा कोहलीकडून घेतल्या जात होत्या. फलंदाजीला मागे दिनेश कार्तिक होता. महिपाल लोमरोर होता. विराट कोहलीने जोखीम पत्करायला हवी होती, असं सुनील गावसकर म्हणाले.
कोहलीने योग्य स्ट्राईक रेटने फलंदाजी केली असती तर...
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू सायमन कॅटिचनेही यावर भाष्य केलं. सायमन म्हणाला की, “मला वाटते रजत पाटीदारने चांगली फलंदाजी केली. तो चौकार-षटकार मारण्याचा प्रयत्न करत होते. विराट कोहलीनेही हे करायला हवे. जर त्याने योग्य स्ट्राईक रेटने फलंदाजी केली असती तर आरसीबीची धावसंख्या 206 ऐवजी 220 झाली असती.
कोहलीचे 37 चेंडूत अर्धशतक-
या सामन्यात विराट कोहलीने 37 चेंडूत अर्धशतक झळकावले. या काळात त्याने 4 चौकार आणि एक षटकार मारला. कोहलीने रजत पाटीदारसह तिसऱ्या विकेटसाठी 65 धावा जोडल्या, तर फाफ डू प्लेसिससोबत पहिल्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीचे या मोसमातील हे चौथे अर्धशतक आहे. याआधी त्याने पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध 50 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
विराट कोहलीनं 10 हंगामात 400 पेक्षा जास्त धावा केल्या -
आयपीएल 2008 पासून विराट कोहली आरसीबीसाठी खेळत आहे. विराट कोलीने 2011 मध्ये पहिल्यांदा 400 धावांचा पल्ला गाठला होता. त्यानं 16 सामन्यात 557 धावांचा पाऊस पाडला होता. त्यानंतर 2012, 2014, 2017 आणि 2022 या चार हंगामात विराट कोहलीला 400 धावांचा पल्ला पार करता आला नाही. म्हणजेच, 2008,2009,2010, 2012, 2014, 2017 आणि 2022 या सात हंगामात विराट कोहलीला 400 धावांचा पल्ला पार करता आला नाही. तर विराट कोहलीने 10 हंगामात 400 धावांचा टप्पा पार केला आहे.
संबंधित बातम्या:
10 व्या स्थानावरुन प्ले ऑफच्या फेरीपर्यंत; आरसीबीचा पुढील मार्ग कसा असेल?, जाणून घ्या समीकरण!
Kavya Maran: हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम