IPL 2023 : दिल्लीच्या संघात दोन बदल, गुजरातमध्ये मिलरची एन्ट्री, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
IPL 2023: गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Delhi Capitals vs Gujarat Gaints IPL 2023 : गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर दिल्लीचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. दिल्ली आणि गुजरात संघाच्या प्लेईंग ११ मध्ये बदल करण्यात आला आहे. केन विल्यमसन दुखापतग्रस्त झाल्यामुळे आयपीएलमधून बाहेर गेलाय. गुजरातने पहिला सामना जिंकून आयपीएलची सुरुवात दणक्यात केली होती. तर दिल्लीला अद्याप पहिला विजय मिळवता आलेला नाही. आज दिल्ली पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील असेल तर गुजरात आफली विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल.
दिल्लीच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. दिल्लीने एनरिक नॉर्खिया आणि अभिषेक पोरेल यांना संधी दिली आहे. दिल्लीकडून रोवमन पॉवेल याला संघाबाहेर ठेवण्यात आळे आहे. तर गुजरातच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. केन विल्यमसनच्या जागी डेविड मिलरला संधी देण्यात आली आहे. डेविड मिलर सोमवारी गुजरातच्या संघासोबत जोडला होता. गुजरातच्या पहिल्या सामन्यात केन विल्यमसन दुखापतग्रस्त झाला होता. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग ११ मध्ये कोण कोण आहे...
दिल्लीची प्लेईंग ११
पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर (कर्णधार), मिचेल मार्श, रीली रोसो, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), अमन खान, मुकेश कुमार, अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिक नॉर्खिया.
गुजरातची प्लेईंग ११
शुभमन गिल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटिल, यश दयाल आणि अल्जारी जोसेफ.
Gujarat Titans have won the toss and elect to bowl first against @DelhiCapitals
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2023
Live - https://t.co/9Zy9HcuWS6 #TATAIPL #DCvGT #IPL2023 pic.twitter.com/q43LKdiAHm
Match 7. Gujarat Titans XI: S Gill, W Saha (wk), S Sudharsan, H Pandya (c), D Miller, R Tewatia, R Khan, M Shami, J Little, Y Dayal, A Joseph. https://t.co/tcVIlEJ3bC #TATAIPL #DCvGT #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2023
Match 7. Delhi Capitals XI: D Warner (c), P Shaw, R Rossouw, M Marsh, S Khan, A Porel (wk), A Khan, A Patel, K Yadav, A Nortje, M Kumar. https://t.co/tcVIlEJ3bC #TATAIPL #DCvGT #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2023
GT vs DC Pitch Report : कशी असेल खेळपट्टी?
अरुण जेटली स्टेडियमच्या मैदानावर अनेक उच्च मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले आहेत. आयपीएलमध्ये अनेकवेळा या मैदानावर संघाने 200 च्या पुढे धावा केल्या आहेत. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी टी-20 सामन्यात फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर ठरली आहे. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. येथे चेंडू बॅटवर चांगला येतो आणि फलंदाज याचा आनंद घेतात.