एक्स्प्लोर
कोलकात्याची दिल्लीवर मात, गुणतालिकेत पुन्हा अव्वल
कोलकाता : कर्णधार गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकात्यानं दिल्लीला सात विकेट्स आणि 22 चेंडू राखून हरवलं. या विजयासह केकेआरने आयपीएलच्या गुणतालिकेत पुन्हा अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
कोलकात्याचा हा नऊ सामन्यांमधला सातवा विजय ठरला. तर दिल्लीचा हा सात सामन्यांमधला पाचवा पराभव असून, झहीर खानचा संघ चार गुणांसह गुणतालिकेत तळाशी आहे.
ईडनवर झालेल्या लढतीत दिल्लीनं कोलकात्याला विजयासाठी 161 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना गंभीरनं 52 चेंडूंत 11 चौकारांसह नाबाद 71 धावांची भक्कम खेळी उभारली.
गंभीरनं रॉबिन उथप्पाच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी रचली. उथप्पानं 33 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांसह 59 धावा फटकावल्या.
त्याआधी संजू सॅमसनच्या 60 आणि श्रेयस अय्यरच्या 47 धावांच्या खेळींच्या जोरावर दिल्लीनं 20 षटकांत सहा बाद 160 धावांची मजल मारली होती. कोलकात्याचा गोलंदाज नॅथन कूल्टर-नाईलनं 34 धावांत दिल्लीच्या तीन फलंदाजांना माघारी धाडून आपल्या टीमच्या विजयाला हातभार लावला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement