एक्स्प्लोर

India Vs England : 'भारतीय फलंदाज' म्हणून जार्वोची मैदानात एन्ट्री अन्... व्हिडीओ व्हायरल 

IND Vs ENG 3rd Test: जार्वोनं मैदानात दुसऱ्यांदा एन्ट्री घेतली. यावेळी जार्वो फिल्डर म्हणून नाही तर फलंदाज म्हणून मैदानात उतरला तोही भारतीय फलंदाज म्हणून..

India Vs England 3rd Test: भारत आणि इंग्लंड दरम्यान लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याचा तिसरा दिवस महत्वाचा ठरला. मात्र तिसऱ्या दिवशी मैदानावर घडलेल्या एका घटनेनं क्रिकेट चाहत्यांची चांगलीच करमणूक झाली. तिसऱ्या दिवशी जार्वो नावाचा एक क्रिकेट फॅन पुन्हा एकदा मैदानात घुसला. जार्वोनं  69 नंबरची भारताची जर्सी घातली होती सोबत पॅड आणि हेल्मेट देखील घातलं होतं. 

जार्वोनं लीड्समध्ये भारतीय फलंदाजाच्या रुपात एन्ट्री घेतली आणि एकच खळबळ उडाली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर तो मैदानात घुसला. पंचांनी लगेच त्याला बाहेर काढण्याचे आदेश दिले. नंतर सेक्युरिटी गार्ड्सनी त्याला उचलून मैदानाबाहेर नेले.  

हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाला आहे. सोबतच जार्वोचे फोटो देखील व्हायरल होत आहेत. जार्वो क्रिझपर्यंत पोहोचला होता. दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी देखील तो मैदानात उतरला होता.  

 तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताच्या 2 बाद 215

भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळल्या जाणाऱ्या  हेंडिग्ले येथे तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस 2 बाद 215 धावांपर्यंत भारताने मजल मारली.  वातावरण खराब असल्याने आजचा सामना वेळेपूर्वीच थांबवण्यात आला.  चेतेश्वर पुजारा 15 चौकारांसह 91  तर विराट कोहली 6 चौकारांसह  45 धावांवर नाबाद होते. भारताची दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर केएल राहुलला  क्रेग ओव्हर्टनने आठ धावांवर तंबूचा मार्ग दाखवला. तर रोहित शर्माने 156 बॉलमध्ये  59 धावा केल्या.  ओली बॉबिन्सन रोहित तंबुत माघारी धाडले. रोहितनंतर कर्णधार विराट कोहली मैदानात आला. त्याने पुजारासोबत  99 धावांची भागीदारी केली. रोहित बाद झाल्यानंतर पुजाराचे अर्धशतक झाले.

IND vs ENG, 2nd Innings Highlights : तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाचे शानदार प्रदर्शन; रोहितचं अर्धशतक, पुजारा शतकाच्या उंबरठ्यावर

इंग्लंडचा पहिला डाव  

इंग्लडने भारताविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या  दिवसाच्या खेळाच्या अखेरीस पहिल्या डावात  432  धावा करत  354  धावांची आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या डावात फक्त 78 धावा केल्या आहेत. कर्णधार जो रूट 165 बॉलमध्ये 121 धावा केल्या आहे. त्यामुळे इंग्लंडने भारतासमोर  432 उभारल्या आहे. इंग्लंडने आज 8 बाद 423 धावांपुढे खेळण्यास सुरूवात केली.  क्रेग ओव्हर्टनने 24 धावा केल्या.  शमीने ओव्हर्टनला आणि बुमराहने रॉबिन्सनला बाद करत इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. इंग्लंडकडून रुट शिवाय  अलवावा डेविड मलानने 70, हसीब हमीदने 68, रोरी बर्न्‍सने 61, जॉनी बेयरस्टोने 29, क्रेग ओवरटनने 32, सॅम कर्रनने 15, मोइन अली ने आठ, जोस बटलरने सात धावा केल्या. ओली रॉबिंसन आणि जेम्स एंडरसन एकही धाव न करता तंबूत परतले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget