Commonwealth Games 2022 : वेटलिफ्टिंगच्या बाबतीत भारत जगातील दुसरा यशस्वी देश, असं आहे रेकॉर्ड
Weightlifting in CWG : यंदा इंग्लंडच्या बर्मिंगहम शहरात कॉमनवेल्थ गेम्स 2022 जुलै-ऑगस्ट महिन्यात पार पडणार असून भारताची ऑलिम्पिक विजेती मीराबाई चानू या खेळांमध्ये सहभागी होईल.
Indian Weightlifters in Commonwealth Games : कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games) खेळांमध्ये भारतीय वेटलिफ्टर्सचा (Indian Weightlifters) कायमच दबदबा राहिला आहे. कारण भारतीय वेटलिफ्टर्सने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 125 पदकं जिंकली असून 43 सुवर्णपदकांचा यामध्ये समावेश आहे. या संख्येत भारत ऑस्ट्रेलियापेक्षा काही पदकं मागे असून ऑस्ट्रेलियाने 159 पदकं आजवर जिंकली आहेत. त्यामुळे कॉमनवेल्थ गेम्समध्ये वेटलिफ्टिंगच्या बाबतीत भारत सर्वात यशस्वी देश आहे.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये तीन वेळा असंही झालं आहे की, भारतीय टीम वेटलिफ्टिंगमध्ये मेडल जिंकण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर राहिली आहे. 1990, 2002 आणि 2018 साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय वेटलिफ्टर्सने इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक पदकं जिंकली होती. गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या मागील कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत भारताने 5 गोल्ड आणि एकूण 9 पदकं जिंकली होती. त्यामुळे यंदाही भारतीय वेटलिफ्टर्सकडून उत्तम प्रदर्शन होण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये यंदा भारताकडून 15 वेटलिफ्टर्सचा गट पाठवला जात आहे. विशेष म्हणजे हे सर्वजण अव्वल दर्जाचे असून सर्वांमध्ये पदक जिंकण्याची शक्यता आहे. तसंच टोक्यो ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू देखील महिलांच्या 49 किलो वजनी गटात असून तिच्याकडून पदकाची दाट अपेक्षा आहे. याशिवाय बिंदियाराणी (55 किलो), पॉपी (59 किलो) या देखील यावेळी भारताचं प्रतिनिधित्त्व करतील.
भारतीय वेटलिफ्टर्सचा संघ :
महिला: मीराबाई चानू (49 किलो), बिंदियाराणी देवी (55 किलो), पॉपी हजारिका (59 किलो), हरजिंदर कौर (71 किलो), पूनम यादव (76 किलो), उषा कुमारी (87 किलो), पुर्णिमा पांडे (+87 किलो)
पुरुष: संकेत सागर (55 किलो), गुरूराजा पुजारी (61 किलो), जैरेमी लालरिनुनगा, अचिंता श्यूली (73 किलो), अजय सिंह (81 किलो), विकास ठाकुर (96 किलो), लवप्रीत सिंह (109 किलो), गुरूदीप सिंह (+109 किलो)
हे देखील वाचा-
- Commonwealth Games 2022 : खेळाडूंना मानसिक तणावाशी सामना करण्यासाठी ट्रेनिंग द्यायला हवी; कॉमनवेल्थचं तिकीट मिळाल्यानंतर निखत जरीनचं वक्तव्य
- Commonwealth Games 2022 : आगामी कॉमनवेल्थ गेम्ससाठी 'या' भारतीय महिला कुस्तीपटूंची निवड, इंग्लंडमध्ये रंगणार स्पर्धा
- Commonwealth Games 2022 : आगामी कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी भारताला मोठा झटका, दिग्गज बॉक्सर मेरी कोमची माघार