एक्स्प्लोर

ICC World Cup 2019 : भारताला आणखी एक झटका, भुवनेश्वर 2 ते 3 सामन्यांमधून बाहेर

भुवनेश्वर कुमार हा शिखर धवननंतर विश्वचषकात दुखापतग्रस्त झालेला भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे.

मुंबई : विश्वचषकात भरतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे पुढील दोन ते तीन सामन्यातून बाहेर झाला आहे. पाकिस्तान विरुद्ध रविवारी (16 जून) झालेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या डाव्या पायाचा स्नायू दुखावला होता. भुवनेश्वर कुमार हा शिखर धवननंतर विश्वचषकात दुखापतग्रस्त झालेला भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे. दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमारला मैदान सोडावं लागलं होतं. मैदान सोडण्यापूर्वी त्याने केवळ 2 षटकं आणि चार चेंडू एवढीच गोलंदाजी केली होती. त्याने 2.4 षटकात आठ धावा केल्या होत्या. त्याचं षटक पूर्ण करण्यासाठी आलेल्या विजय शंकरने विश्वचषकातील पदार्पणाच्या पहिल्याच सामनच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. त्याने इमाम उल हकला पायचीत करुन माघारी धाडलं. अफगाणिस्तान (22 जून) आणि वेस्ट इंडिजविरुद्ध (27 जून) होणाऱ्या सामन्यासाठी भुवनेश्वर अंतिम 11 खेळाडूंमध्ये नसेल. तसंच 30 जून रोजी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याच्या समावेशाबाबत साशंकता आहे, अशी माहिती भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिली. "भुवनेश्वरची दुखापत किरकोळ आहे. फूट मार्कवरुन पाय घसरल्यामुळे ही दुखापत झाली. सध्याच्या घडीला दुखापत फार गंभीर वाटत नाही. आम्ही त्याला थोडा वेळ देणार आहे. आशा आहे की पुढच्या काही सामन्यांआधी तो फिट होईल. जर नाहीच झाला, तर तीन सामन्यांमध्ये तो खेळू शकणार नाही," असं विराट कोहली म्हणाला. संबंधित बातम्या World Cup 2019 | टीम इंडियाची विश्वचषकातील विजयी परंपरा कायम, प्रतिस्पर्धी पाकिस्तानला चारली धूळ World Cup 2019 | सुपरफास्ट विराट, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला रोहित शर्मा बनला 'सिक्सर किंग', 'या' विक्रमाला गवसणी World Cup 2019 | रोहित-राहुलने मोडला 23 वर्षापूर्वीचा सचिन-सिद्धूचा विक्रम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur Plastic Rice Reality Check : रेशन दुकानात प्लास्टिकचा तांदूळ? 'एबीपी माझा'चा रिॲलिटी चेकYuva Sena Win Senate Election :सिनेटमध्ये दस का दम; मातोश्रीवर 'शत प्रतिशत' विजयोत्सव Special ReportAmruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget