पायलट बनण्यासाठी 'या' 21 वर्षीय क्रिकेटपटूची निवृत्ती
कार्टरने 2015मध्ये हाँगकाँग संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. कार्टरने त्याच्या कारकिर्दित 11 एकदिवसीय सामने आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत.

मुंबई : हाँगकॉंग संघाचा युवा विकेटकीपर आणि फलंदाज ख्रिस्टोफर कार्टरने वयाच्या 21व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेटच्या सर्व प्रकारातून कार्टरने निवृत्ती स्वीकारली आहे. नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत कार्टर हाँगकाँग संघामध्ये होता.
शिक्षणासाठी कार्टरने क्रिकटमधून निवृत्ती घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. क्रिकेटपासून दूर राहून कार्टरला आपलं शिक्षण पूर्ण करायचं आहे. क्रिकेटसाठी कार्टरने आपलं शिक्षण अर्ध्यावरच सोडलं होतं.
साउथ चायना मॉर्निंगशी बोलताना कार्टनने सांगितलं की, मी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा करत आहे. माझी स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे. माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला आता काम करायचं आहे. मला लहानपणापासून पायलट बनण्याची इच्छा होती. त्यामुळे माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला क्रिकेटपासून दूर जावं लागणार आहे.
कार्टरने 2015मध्ये हाँगकाँग संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. कार्टरने त्याच्या कारकिर्दित 11 एकदिवसीय सामने आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत.
क्रिकेटला सोडचिठ्ठी देताना कार्टरने हाँगकाँग किक्रेटच्या समस्यांवर वक्तव्य केलं. "हाँगकाँगमध्ये क्रिकेटसाठी मिळणारं अर्थसहाय्य तुटपुंजे आहे. यामुळे मी क्रिकेटमधून बाहेर पडत आहे. हाँगकाँगमध्ये क्रिकेटर होणं कठीण काम आहे. हाँगकाँगमधील लोक या खेळाप्रती गंभीर नाहीत," असं कार्टरने म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
