एक्स्प्लोर
विजयी गोलनंतर नेमारला अश्रू अनावर, ब्राझिलचा 2-0 ने विजय
ब्राझिलला सलामीच्या सामन्यात स्वित्झर्लंडने 1-1 असं बरोबरीत रोखलं होतं. त्यामुळे ब्राझिलने कोस्टा रिकाला हरवून, विश्वचषकातला आपला पहिलाच विजय साजरा केला.
मॉस्को : ब्राझिलने कोस्टा रिकाचा 2-0 असा धुव्वा उडवून, रशियातल्या फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीचं दार ठोठावलं. ब्राझिलला सलामीच्या सामन्यात स्वित्झर्लंडने 1-1 असं बरोबरीत रोखलं होतं. त्यामुळे ब्राझिलने कोस्टा रिकाला हरवून, विश्वचषकातला आपला पहिलाच विजय साजरा केला.
या सामन्यात मध्यंतराला आणि निर्धारित वेळेतही बरोबरीची कोंडी फुटू शकली नाही. अखेर एन्जुरी टाईममध्ये फिलिप कुटिन्होने पहिल्याच मिनिटाला ब्राझिलचं खातं उघडलं. मग डग्लस कोस्टाने दिलेल्या पासवर नेमारने ब्राझिलचा दुसरा गोल झळकावला.
नेमारने 97 व्या मिनिटाला गोल मारुन ब्राझिलच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ब्राझिलने कोस्टा रिकाविरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या सर्व 11 सामन्यांपैकी 10 वेळा विजय मिळवला आहे. कोस्टा रिकाने ब्राझिलविरुद्ध 1960 साली एकमेव विजय मिळवलेला आहे.
विजयी गोलनंतर नेमार भावूक
ब्राझिलचा फुटबॉलवीर नेमार ज्युनियर कोस्टा रिकाविरुद्धच्या सामन्यानंतर कमालीचा भावूक झाला. हा सामना संपल्याची शिट्टी रेफरीने फुंकली आणि मैदानावरच बसलेल्या नेमारने आपल्या भावनांना अश्रूंमधून वाट मोकळी करून दिली.
नेमारने कोस्टा रिकावर एक गोल डागून ब्राझिलच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पण दोन दिवसआधी तो या सामन्यात खेळू शकेल की नाही याविषयी शंका होती. कारण, स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यात नेमारचा घोटा दुखावला होता.
मंगळवारी ब्राझिलचा सराव सुरू असताना नेमारच्या घोट्याच्या दुखापतीने उचल खाल्ली. त्यामुळे त्याला सरावातून माघार घ्यावी लागली होती. त्या दुखापतीतून सावरलेला नेमार कोस्टा रिकाविरुद्धच्या सामन्यात खेळला आणि त्याने गोलही झळकावला. त्यामुळे तो भावूक झालेला दिसला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement