एक्स्प्लोर
महामुकाबल्यात 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती?
मुंबई : भारतीय प्रेक्षकांना 24 डिसेंबर 2007 या दिवसाची 24 वर्षे वाट पाहावी लागली. भारताने दहा वर्षांपूर्वी पाकिस्तानला हरवून टी-20 विश्वचषक आपल्या नावावर केला होता. विशेष म्हणजे पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवल्याने भारताचा हा विजय आणखीच अविस्मरणीय बनला.
आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आयसीसी टूर्नामेंटच्या फायनलमध्ये दहा वर्षांनी भिडणार आहेत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलच्या या मुकाबल्यात भारत इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती करणार का, याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.
आयसीसी टूर्नामेंटच्या फायनलमध्ये उभय संघ भिडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2007 साली टी-20 विश्वचषकात झालेल्या फायनलमध्ये टीम इंडियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करत टीम इंडियाने गौतम गंभीरच्या 75 धावांच्या अविस्मरणीय खेळीच्या जोरावर 157 धावांचं लक्ष्य ठेवलं.
भारताने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानी फलंदाज विजयाच्या जवळ जाताना दिसले. अखेरच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 8 धावांची गरज होती. मात्र तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या चलाखीने हा संपूर्ण सामनाच बदलला.
कुणालाही अपेक्षित नसेल, असा निर्णय धोनीने घेतला. सर्वात कमी अनुभव असणाऱ्या जोगिंदर शर्माच्या हातात धोनीने चेंडू दिला. जोगिंदरनेही धोनीचा विश्वास सार्थ ठरवत टीम इंडियाला 5 धावांनी विजय मिळवून दिला.
भारतानेही इतिहासात पहिल्यांदाच टी-20 चा विश्वविजेता होण्याचा मान मिळवला. शिवाय धोनीनेही त्याच्या कर्णधारपदाच्या पहिल्याच आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारताला घवघवीत यश मिळवून दिलं.
या महामुकाबल्याला 10 वर्षे उलटून गेले आहेत. मात्र तरीही भारत आणि पाकिस्तानमध्ये आयसीसी टूर्नामेंटचा फायनल झालेला नाही. त्यामुळे 10 वर्षानंतर पहिल्यांदाच आयसीसी टूर्नामेंटमध्ये उभय संघ पुन्हा एकदा भिडणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement