एक्स्प्लोर
अंबाती रायुडुचं नाबाद शतक, चेन्नईकडून हैदराबादचा आठ विकेट्सनी धुव्वा
सलामीच्या अंबाती रायुडूनं झळकावलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सनं सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात हैदराबादनं चेन्नईला विजयासाठी 180 धावांचं आव्हान दिलं होतं.

पुणे : सलामीच्या अंबाती रायुडूनं झळकावलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सनं सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात हैदराबादनं चेन्नईला विजयासाठी 180 धावांचं आव्हान दिलं होतं.
रायुडूनं नाबाद शतक साजरं करून, चेन्नईला सहा चेंडू आणि आठ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. रायुडूनं 62 चेंडूंत सात चौकार आणि सात षटकारांच्या साथीनं नाबाद 100 धावांची खेळी उभारली. त्यानं शेन वॉटसनच्या साथीनं 134 धावांची सलामी दिली.
वॉटसननं 35 चेंडूंत 57 धावांची खेळी केली. मग रायुडू आणि धोनीनं चेन्नईच्या विजायवर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी, शिखर धवन आणि केन विल्यमसननं दुसऱ्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी उभारून, हैदराबादला वीस षटकांत चार बाद 179 धावांची मजल मारून दिली होती.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
हिंगोली
व्यापार-उद्योग
शेत-शिवार
Advertisement
Advertisement



















