एक्स्प्लोर
चेन्नई सुपर किंग्जकडून हे तीन दिग्गज पुन्हा खेळणार!
फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनबाबत अजून निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.
नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दोन वर्षांच्या बंदीनंतर चेन्नई सुपर किंग्ज पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. सीएसकेने महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि रवींद्र जाडेजा यांनी रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनबाबत अजून निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.
''सीएसकेने आतापर्यंत लिस्ट सादर केलेली नाही, मात्र धोनी आणि रैनाला रिटेन करु हे वेगळं सांगायची गरज नाही. तिसरं नाव जाडेजाचं असू शकतं'', अशी माहिती सीएसकेच्या रणनितीची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने दिली.
सीएसके व्यवस्थापनाने अश्विनला रिटेन करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असंही अधिकाऱ्याने सांगितलं. अश्विनचा सध्या भारतीय वन डे आणि टी-20 संघामध्येही समावेश नाही. शिवाय कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांचं प्रदर्शन पाहता त्याचं पुनरागमन अशक्य असल्याचंही बोललं जात आहे.
अश्विन जवळपास गेल्या एक वर्षापासून भारतीय टी-20 संघातून बाहेर आहे. त्यामुळे साहजिकच याचा आयपीएलमधील सहभागावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सीएसकेत कुणाचं पुनरागम होतं, ते पाहणं महत्त्वाचं असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement