एक्स्प्लोर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार

लंडनः आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. पुढील वर्षी 1 जून रोजी इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप 'ब' मध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत, त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान लढत पाहायला मिळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे ग्रुपः ग्रुप A ग्रुप B ऑस्ट्रेलिया भारत न्यूझीलंड साऊथ अफ्रिका इंग्लंड श्रीलंका बांगलादेश पाकिस्तान
आणखी वाचा























