Ind vs Nz Final : वर्ल्डकप जिंकला रे... नरेंद्र मोदी स्टेडियमवर इतिहास घडला, भारताने किवींना हरवत पुन्हा विश्वचषक उंचावला
India vs New Zealand Final Update In Marathi : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे आज 8 मार्च रोजी आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात सामना खेळला गेला.
LIVE

Background
India vs New Zealand Final Update In Marathi : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे आज 8 मार्च रोजी आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा इतिहास रचत विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले.
उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला, तर भारताने इंग्लंडवर 7 धावांनी रोमांचक विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष अंतिम सामन्याच्या पिचकडे लागले आहे. विशेष म्हणजे या विश्वचषकात अहमदाबादमध्ये दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Ind vs Nz Final : वर्ल्डकप जिंकला रे... नरेंद्र मोदी स्टेडियमवर इतिहास घडला, भारताने किवींना हरवत पुन्हा विश्वचषक उंचावला
अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून भारताने विजेतेपद पटकावले.
भारताच्या 255 धावांच्या प्रत्युत्तर न्यूझीलंडचा संघ 19 षटकांत 159 धावांवर गारद झाला.
𝐓𝐇𝐑𝐄𝐄-𝐓𝐈𝐌𝐄 𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 🏆
— ICC (@ICC) March 8, 2026
A milestone home #T20WorldCup triumph for India 🙌 pic.twitter.com/jBk9UWsOh8
Ind vs Nz Final Update : बुमराहचा धमाका, ॲलननंतर रचिन OUT...
जसप्रीत बुमराहने पहिल्याच चेंडूवर टीम इंडियाला यश मिळवून दिले.
अंतिम फेरीत त्याने पहिल्याच चेंडूवर रचिन रवींद्रला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
रचिनला एक धाव करता आली. याआधी अक्षरने फिन ॲलनला बाद केले होते.
त्याला नऊ धावा करता आल्या.
चार षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा आहे.



















