एक्स्प्लोर

IND W vs AUS W Pink-ball Test : 3 दिवसही टिकली नाही टीम इंडिया! पिंक बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा 10 विकेट्सनी विजय, मालिकाही हातची गेली

IND W vs AUS W Pink-ball Test: पर्थ येथील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन ग्राउंड येथे खेळल्या गेलेल्या डे-नाईट टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारतावर एकतर्फी विजय मिळवला.

IND W vs AUS W Pink-ball Test : पर्थ येथील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन ग्राउंड (WACA) येथे खेळल्या गेलेल्या डे-नाईट टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारतावर एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय महिला संघ पूर्णपणे अपयशी ठरला आणि त्यामुळे मालिकाही गमवावी लागली. भारताचा डाव तीन दिवसही टिकू शकला नाही. तिसऱ्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने सामना जिंकत मालिकेवर शिक्कामोर्तब केले.

भारतीय फलंदाजीची निराशाजनक कामगिरी... 

या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच सत्रापासून सामन्यावर पकड मिळवली. भारतीय संघ पहिल्या डावात 62.4 षटकांत 198 धावांवर गारद झाला. जेमिमा रॉड्रिग्ज हिने अर्धशतक झळकावले, मात्र इतर फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून अ‍ॅनाबेल सदरलँड हिने सर्वाधिक 4 विकेट्स घेत भारतीय फलंदाजीला मोठा धक्का दिला.

यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 323 धावा करत 125 धावांची भक्कम आघाडी मिळवली. अ‍ॅनाबेल सदरलँड हिने गोलंदाजीनंतर फलंदाजीतही कमाल करत 129 धावांची शानदार शतकी खेळी केली. एलिस पेरी हिने 76 धावा करत महिला कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनण्याचा मान मिळवला. भारताकडून पदार्पण करणाऱ्या सयाली सतघरे हिने 4 विकेट्स घेतल्या, मात्र ऑस्ट्रेलियाला मोठा स्कोअर करण्यापासून रोखता आले नाही.

दुसऱ्या डावातही अपयश

भारतीय संघाची दुसऱ्या डावातही स्थिती फारशी सुधारली नाही. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा पुन्हा एकदा लवकर बाद झाल्या. सदरलँड आणि पदार्पण करणाऱ्या लुसी हॅमिल्टन यांनी मिळून भारतीय टॉप ऑर्डरला धक्का दिला. परिणामी भारताचा दुसरा डाव केवळ 149 धावांत आटोपला.

प्रतिका रावल हिने 63 धावांची झुंजार खेळी करत संघाला काहीशी झुंज दिली आणि ऑस्ट्रेलियासमोर 25 धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य अवघ्या 4.3 षटकांत एकही विकेट न गमावता सहज गाठले.

ऑस्ट्रेलियाने 5-2 ने जिंकली मालिका

ही मल्टी-फॉर्मॅट मालिका होती, ज्यात 3 टी-20, 3 वनडे आणि 1 कसोटी सामना खेळवण्यात आला. भारताने सुरुवातीला टी-20 मालिका 2-1 ने जिंकत आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन केले. त्यांनी वनडे मालिका 3-0 ने जिंकली आणि आता कसोटी सामनाही जिंकत संपूर्ण मालिका 5-2 ने आपल्या नावावर केली.

हे ही वाचा -

Ind vs Nz Final Update : जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये रणसंग्राम! भारत-न्यूझीलंड आमनेसामने, कोण उचलेल विश्वचषक?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
क्रिकेटमध्ये खळबळ; कोलकाताच्या स्टार गोलंदाजावर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तानचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
क्रिकेटमध्ये खळबळ; कोलकाताच्या स्टार गोलंदाजावर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तानचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Sanju Samson ICC Award : संजूच्या जिद्दीचा विजय; आयसीसी 'प्लेयर ऑफ द मंथ' किताबावर आता सॅमसनचंच नाव, रचला इतिहास
संजूच्या जिद्दीचा विजय; आयसीसी 'प्लेयर ऑफ द मंथ' किताबावर आता सॅमसनचंच नाव, रचला इतिहास
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK Vs KKR : कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
Donald Trump : अमेरिका इराण यांच्यातील तणाव कमी होणार? इराणसोबत दोन दिवसात चर्चा शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा दोन दिवसात शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
Gold Rate : सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
Embed widget