Ind vs Nz Final T20 World Cup 2026 : भारताविरुद्ध कायम गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी! टीम इंडिया की न्यूझीलंड? थेट चॅम्पियनच नाव जाहीर करून टाकलं
India VS New Zealand Final T20 World Cup 2026 : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीर पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.

India VS New Zealand Final T20 World Cup 2026 : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीर पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. भारताबद्दल टीका करण्याची त्याची सवय अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. भारत चांगली टीम आहे आणि टी-20 विश्वचषक जिंकण्याची क्षमता ठेवते, हे मान्य करायलाही अमीर तयार नाही. अंतिम सामन्यापूर्वी त्याने पुन्हा एकदा भविष्यवाणी करत न्यूझीलंडच चॅम्पियन होईल असे म्हटले आहे.
याआधीही अमीरने अनेकदा भारताविरुद्ध अंदाज व्यक्त केले होते. त्याने सुरुवातीला भारत सेमीफायनलमध्ये पोहोचणार नाही असे सांगितले होते, पण टीम इंडिया टॉप-4 मध्ये पोहोचला. त्यानंतर त्याने भारत अंतिम फेरीत जाणार नाही असे म्हटले, मात्र भारताने इंग्लंडचा पराभव करून फायनल गाठले. आता पुन्हा एकदा त्याने भारताला अंतिम सामन्यात पराभव होईल असा दावा केला आहे. त्याच्या सततच्या अशा वक्तव्यांमुळे तो भारतीय संघाबद्दल किती नकारात्मक विचार करतो हे दिसून येते.
अमीरची पुन्हा कीवी संघाच्या विजयाची भविष्यवाणी
पाकिस्तानमधील एका टीव्ही शोमध्ये मोहम्मद अमीरने न्यूझीलंडच्या विजयाची घोषणा केली. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने विचारले की अंतिम सामना लाल आणि काळ्या मातीच्या पिचवर खेळला जाईल. जर न्यूझीलंडने आधी गोलंदाजी केली तर कोण जिंकेल? यावर अमीरने ठामपणे सांगितले की कीवी संघच जिंकेल.
मात्र या कार्यक्रमात सहभागी असलेले अहमद शहजाद आणि रशीद लतीफ यांनी वेगळे मत मांडले. त्यांनी स्पष्टपणे भारताच्या विजयाचा अंदाज व्यक्त केला.
यानंतर सूत्रसंचालकाने प्रश्न बदलून विचारले की, जर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली तर कोण जिंकेल? यावरही अमीरने न्यूझीलंडच जिंकेल असेच सांगितले. मात्र राशिद लतीफ आणि अहमद शहजाद यांनी या परिस्थितीत भारतच विजयी होईल असे मत व्यक्त केले. म्हणजेच अमीरने प्रत्येक परिस्थितीत भारताच्या पराभवाचीच भविष्यवाणी केली.
गोलंदाजीवर अमीरचा भर
अमीरच्या मते दोन्ही संघांची फलंदाजी जवळपास सारखीच आहे, मात्र गोलंदाजीत फरक आहे. त्याच्या म्हणण्यानुसार न्यूझीलंडची गोलंदाजी भारतापेक्षा अधिक मजबूत आहे. त्याने जसप्रीत बुमराह उत्कृष्ट गोलंदाजी करत असल्याचे मान्य केले, पण एकूण पाहता कीवी संघाची गोलंदाजी अधिक तगडी असल्याचे सांगितले. तसेच भारताने अंतिम सामन्यात कुलदीप यादवला खेळवले तर संघाचे पारडे जड होऊ शकते, कारण मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरते. त्याच्या मते वरुण चक्रवर्तीच्या जागी कुलदीपला संधी दिली जाऊ शकते.
हे ही वाचा -




















