एक्स्प्लोर
भारताची नौका अडखळली, विराटसह 3 जण माघारी
पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी टीम इंडियाही तीन बाद 28 अशी संकटात सापडली होती.
केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या 286 धावांत गुंडाळल्याचा टीम इंडियाचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कारण पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी टीम इंडियाही तीन बाद 28 अशी संकटात सापडली होती.
दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांनी मुरली विजय, शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली या तिन्ही फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडून भारतीय संघाच्या आनंदावर विरजण टाकलं. पहिल्या दिवसअखेर चेतेश्वर पुजारा पाच धावांवर, तर रोहित शर्मा शून्यावर खेळत होते.
त्याआधी, भारतीय गोलंदाजांनीही पहिल्या दिवसाच्या खेळावर आपला ठसा उमटवला. भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 286 धावांत गुंडाळून आपली कामगिरी चोख बजावली.
भुवनेश्वर कुमारने 87 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडून भारतीय आक्रमणात प्रमुख भूमिका बजावली. त्याने पहिल्या स्पेलमध्ये तीन फलंदाजांना माघारी धाडून दक्षिण आफ्रिकेची तीन बाद 12 अशी अवस्था केली होती. पण एबी डिव्हिलियर्स आणि फॅफ ड्यू प्लेसीनं चौथ्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी रचून दक्षिण आफ्रिकेच्या डावाला आकार दिला.
त्यानंतर क्विन्टॉन डी कॉक आणि वरनॉन फिलँडरने सहाव्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला सर्व बाद 286 धावांची मजल मारता आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement