एक्स्प्लोर
अमेरिकेत मिनी आयपीएल खेळवण्याची योजना तूर्तास स्थगित
मुंबई : बीसीसीआयनं अमेरिकेत मिनी आयपीएल खेळवण्याची योजना तूर्तास स्थगित केली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
अमेरिकेत क्रिकेट खेळाचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांचा पर्याय उत्तम ठरु शकतो, ही बाब लक्षात घेऊन बीसीसीआयचा अमेरिकेत मिनी आयपील खेळवण्याचा विचार होता. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनीही मिनी आयपीएल किंवा आयपीएल ओव्हरसीज नावानं सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत एक लीग खेळवण्याची कल्पना बोलून दाखवली होता.
कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात स्थानिक वेळेतल्या फरकाची समस्या जाणवत असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. अमेरिकेत मिनी आयपीएलचं आयोजन यशस्वी करायचं, तर सदर लीग स्थानिक आणि भारतीय प्रेक्षकांमध्ये एकाचवेळी लोकप्रिय होणं आवश्यक आहे. पण दोन देशांमधल्या स्थानिक वेळेमधला फरक लक्षात घेता सध्या मिनी आयपीएल खेळवणं शक्य होणार नसल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement