एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BCCIकडे एवढे पैसे नाहीत की, ते मला कोच म्हणून नेमतील: वॉर्न
मुंबई: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर आणि दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मिड-डे या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शेन वॉर्ननं असा दावा केला आहे की, 'भारतीय क्रिकेट बोर्डाकडे (बीसीसीआय) एवढे पैसे नाहीत की, ते मला भारतीय संघाचा कोच म्हणून नियुक्त करतील.'
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाचा सध्याचा प्रशिक्षक अनिल कुंबळेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआयनं नव्या प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले आहेत. प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग, लालचंद राजपूत, टॉम मूडी यांच्यासह अनिल कुंबळेचंही नाव आहे.
टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाबाबत मिड-डेकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर शेन वॉर्न म्हणाला की, 'यात काहीही शंका नाही की, मैदानात माझी आणि कर्णधार कोहलीची पार्टनरशीप खूप चांगली झाली असती, पण बीसीसीआयकडे एवढे पैसे नाहीत की मला कोच म्हणून नियुक्त करतील.'
शेन वॉर्न हा जगातील महान गोलंदाजांपैकी एक आहे. त्यानं कसोटी आणि वनडेमध्ये मिळून 1000 हून अधिक बळी घेतले आहेत. वॉर्ननं 145 कसोटीत 2.26 च्या सरासरीनं 708 बळी घेतले आहेत. तर 194 कसोटीत 4.25च्या सरासरीनं 293 बळी घेतले आहेत.
संबंधित बातम्या:
प्रशिक्षकपदासाठी सेहवागचा दोन ओळींचा बायोडेटा BCCI ला सादर!
कोच कुंबळे आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत: विराट
धोनी, द्रविडवर प्रश्नचिन्ह, रामचंद्र गुहा यांचं राजीनामा पत्र उघड
कुंबळेसमोर वीरुचं आव्हान, प्रशिक्षकपदासाठी सेहवागचाही अर्ज
पिढीतील अंतरामुळे कुंबळे आणि विराटमध्ये धुसफूस : सुनील गावसकर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement