एक्स्प्लोर

Asia Cup: पाकिस्तानी चाहत्यांचा पाठिंबा कोणाला?

आशियातील अन्य देशांचा पाठिंबा कोणाला, याचीही उत्सुका आहे. एबीपी माझाने पाकिस्तानी चाहत्यांना हाच प्रश्न विचारला.

दुबई: आशिया चषकाच्या फायनलमध्ये आज भारत विरुद्ध बांगलादेश सामना रंगणार आहे. रोहित शर्माची टीम इंडिया की मशरफी मुर्तझाचा बांगलादेश, आशियाचा किंग कोण हे आज ठरणार आहे. या संपूर्ण मालिकेत भारताने धडाकेबाज कामगिरी केली आहे. एकही सामना न गमावणाऱ्या भारताने सहज फायनलमध्ये धडक मारली आहे. तर दुसरीकडे बांगलादेशने सुपर फोरच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करुन, फायनलमध्ये एण्ट्री केली. दोन्ही देशाचे चाहते आजच्या सामन्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. मात्र आशियातील अन्य देशांचा पाठिंबा कोणाला, याचीही उत्सुका आहे. एबीपी माझाने पाकिस्तानी चाहत्यांना हाच प्रश्न विचारला. सफाकत, तैमूर आणि सलमान हे तिघेही पाकिस्तानी क्रिकेटर आहेत. ते तिघेही आज आशिया चषकात भारताला पाठिंबा देणार आहेत.  हे तिघे दुबईतील अॅमॅच्युअर लीगमध्ये रोअरिंग लायन्स या संघाकडून खेळत आहेत. रोअरिंग लायन्स या संघात 8 भारतीय आणि 3 पाकिस्तानी खेळाडू आहेत. वर्षभर ते भारतीय संघसहकाऱ्यांसोबत ते या स्पर्धेत खेळतात.  त्यामुळे आशिया चषकाच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा संघ न पोहोचल्याने ते आता भारताच्या बाजूने उभे राहिले आहेत. Asia Cup: पाकिस्तानी चाहत्यांचा पाठिंबा कोणाला? आज महामुकाबला भारतीय गोलंदाजांनी आणि भारतीय फलंदाजांनीही सुपर फोरच्या सामन्यात बांगलादेशवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. पण त्या पार्श्वभूमीवर फायनलच्या लढाईत बांगलादेशचं आव्हान कमी लेखता येणार नाही. कारण त्याच बांगलादेशने तमिम इक्बाल आणि शकिब अल हसनसारख्या बिनीच्या शिलेदारांच्या अनुपस्थितीत सुपर फोरच्या मैदानात बलाढ्य पाकिस्तानला लोळवलं. पाकिस्तानवरच्या या विजयाने बांगलादेशला नक्कीच नवा जोश आणि नवा आत्मविश्वास दिला असेल. बांगलादेशच्या खेळाडूंमधला आणि त्यांच्या पाठीराख्यांमधला उत्साह ही त्यांची मोठी ताकद आहे. टीम इंडियाला ऑन द फिल्ड आणि ऑफ द फिल्डही त्या उत्साहाचा बोचरा अनुभव आला आहे. बांगलादेशने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बड्या बड्या संघांची हवा काढून घेणारा संघ म्हणून ख्याती मिळवली आहे. टीम इंडियाने बांगलादेशकडून ढाक्यात चारवेळा आणि 2007 सालच्या विश्वचषकात एकदा पराभवाची कटू चव चाखली आहे. त्यामुळे फायनलची लढाई जिंकायची तर बांगलादेशला कमी लेखण्याचा धोका टीम इंडिया पत्करणार नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवनने सलामीला दाखवलेलं सातत्य ही आशिया चषकात टीम इंडियाची सर्वात जमेची बाजू आहे. रोहितने चार सामन्यांमध्ये 269, तर धवनने चार सामन्यांमध्ये 327 धावांचा रतीब घातला. त्या दोघांनी अखेरच्या सुपर फोर सामन्यातून विश्रांती घेतली आणि अफगाणिस्तानने तो सामना टाय करण्याचा पराक्रम गाजवला. त्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी आणि दिनेश कार्तिक यांना पायचीत देण्याचा निर्णय चुकीचा होता असं मान्य केलं तरी धोनीला घडणारा धावांचा उपवास टीम इंडियाला परवडणारा नाही. दुबईतल्या संथ खेळपट्ट्यांवर जिथे छोट्या लक्ष्यांचा पाठलाग करणंही कठीण ठरतंय, तिथे धोनीची बॅट तळपण्याची प्रतीक्षा आता त्याच्या कट्टर चाहत्यांनाही सहन होत नाही. भारताच्या भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराचं वेगवान, तर कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, रवींद्र जाडेजा आणि केदार जाधवचं फिरकी आक्रमण आशिया चषकात जबरदस्त फॉर्मात आहे. त्यांना फायनलमध्येही आपल्या लौकिकाला जागावं लागेल. इंग्लंडच्या कसोटी मालिकेतल्या लाजिरवाण्या पराभवाची खरं तर भरपाई होऊ शकत नाही. पण त्या पराभवाच्या ओल्या जखमेवर आशिया चषक किमान फुंकर घालू शकतो. अफगाणिस्तानविरुद्धच्या टाय सामन्यानेही टीम इंडियाला आणि तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्या हुकलेल्या विजयाने छोट्या सरदाराचं रडू थांबता थांबत नव्हतं. त्यामुळे टीम इंडियाचं नाणं पुन्हा खणखणीत वाजवून दाखवायचं आणि भारतीय मनाला नवी उभारी द्यायची तर रोहित शर्मा आणि त्याच्या शिलेदांना आशिया चषक जिंकावाच लागेल. भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उप कर्णधार), लोकेश राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, दीपक चहर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, सिद्धार्थ कौल आणि खलील अहमद. संबंधित बातम्या बांगलादेशला धूळ चारुन भारताला आशिया चषक जिंकण्याची संधी  

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Who Is Subhadeep Ghosh : कधीही खेळला नाही आंतरराष्ट्रीय सामना, आता बनणार टीम इंडियाचा फील्डिंग कोच; कोण आहे शुभदीप घोष?
कधीही खेळला नाही आंतरराष्ट्रीय सामना, आता बनणार टीम इंडियाचा फील्डिंग कोच; कोण आहे शुभदीप घोष?
क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र OUT; टिचकी वाजवली अन् अंपायर फसवला, इंग्लंडमध्ये सामन्यात असा प्रकार घडला की जगभरात VIDEO व्हायरल
क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र OUT; टिचकी वाजवली अन् अंपायर फसवला, इंग्लंडमध्ये सामन्यात असा प्रकार घडला की जगभरात VIDEO व्हायरल
Team India Coach News : रायन टेन डोशेटचा राजीनामा; आता गौतम गंभीर अन् अजित आगरकरांच्या खुर्चीचं काय होणार? BCCI च्या पुढच्या निर्णयाकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष
रायन टेन डोशेटचा राजीनामा; आता गौतम गंभीर अन् अजित आगरकरांच्या खुर्चीचं काय होणार? BCCI च्या पुढच्या निर्णयाकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget