एक्स्प्लोर
VIDEO: मॅचदरम्यान फुटबॉलपटूचा मैदानावरच मृत्यू

ब्यूनिस आयर्स (अर्जेटिना): अर्जेटिनाचा एका फुटबॉलपटूचा मैदानातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. स्थानिक फुटबॉल स्पर्धेत फुटबॉलपटू मिकेल फावरेच्या डोक्यावर दोनदा लागल्यानं त्याचा मृत्यू झाला. ही घटना तेव्हा घडली जेव्हा मिकेल लीगा डिपार्टमेंटल द कोलोनमध्ये रविवारी डेफेंसोरेसच्या विरुद्ध सान जॉर्जकडून खेळत होता. 24 वर्षीय फावरेनं विरोधी खेळाडूकडून बॉल घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या संघर्षात फावरे जोरात जमिनीवर कोसळला. त्यावेळी प्रतिस्पर्धी गेरोनिमो क्विनटानाचा पाय फावरेचा डोक्याला लागला. यानंतर तो उठला आणि दोघांमध्ये वाद सुरु झाला. त्याचवेळी इतर खेळाडूही तिथे धावून आले. तेव्हा धावत येणाऱ्या एका खेळाडूचा कोपर फावरेला लागला. व्हिडिओ: त्याचा लागलेला हा फटका एवढा जोरदार होता की, फावरे जमिनीवरच कोसळला. त्यानंतर त्यानं उठण्याचा प्रयत्नही केला. मात्र, तो तिथेच बेशुद्ध पडला. दोन मुलांचा पिता असलेल्या फावरेला रुग्णालयातून जवळच्या दवाखान्यात नेण्यात आलं पण तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
सोलापूर
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग























