एक्स्प्लोर
Advertisement
वडिलांच्या निधनाच्या 24 तासातच राशिद खान मैदानात उतरला!
राशिदने या सामन्यात दोन विकेट्स घेऊन आपल्या संघाला 20 धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाचं योगदान दिलं.
अॅडलेड : वडिलांच्या निधनाच्या 24 तासातच अफगाणिस्तानचा 19 वर्षीय फिरकीपटू राशिद खान बिग बॅश लीगमध्ये (बीबीएल) अॅडलेड स्ट्रायकर्स संघाकडून मैदानात उतरला. या निर्णयाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राशिद खानच्या वडिलांचं सामन्याच्या 24 तास आधी रविवारी निधन झालं होतं. तरीही नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सोमवारी सिंडनी थंडर संघाविरुद्ध तो मैदानात उतरला.
राशिद खानच्या भारतीय नागरिकत्वाबाबत सुषमांचं ट्विट, अफगाणिस्तानचे अध्यक्ष म्हणतात..
राशिदने या सामन्यात दोन विकेट्स घेऊन आपल्या संघाला 20 धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. या सामन्यात अॅडलेड स्ट्रायकर्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात 175 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरादाखल सिडनी थंडर संघाला 6 विकेट्सच्या मोबदल्यात 155 धावाच करता आल्या. यामुळे अॅडलेड स्ट्रायकर्सचा 20 धावांनी विजय झाला.
राशिद खान भारताकडून खेळणार? राशिदने रविवारी सोशल मीडियावर वडिलांच्या निधनावर ट्वीट केलं होतं. 'आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला गमावलं. ते माझे वडील होते. कायम खंबीर राहा, असं तुम्ही का सांगायचा हे मला आज समजलं.'A lot of love for Rashid Khan during a tough time for the popular Striker #BBL08 pic.twitter.com/IhP7f8YMcZ
— cricket.com.au (@cricketcomau) January 1, 2019
राशिदच्या अॅडलेड स्ट्रायकर्स या संघानेही ट्विटरच्या माध्यमातून त्याचं कौतुक केलं. 'या मुलाबाबत अतिशय आदर आणि प्रेम वाटतं,' असं ट्वीट अॅडलेड स्ट्रायकर्सने केलं आहे.Today I lost the most important person in my life,father-the everlasting candle.Inna lillahi wa inna ilayhi raji'un. Now I know why u always asked me to be strong,bcz u knew that today I would need the strength to bear your loss.Will be always in my????????I miss u #plztalktomeOnce???????? pic.twitter.com/BGIHaqKVbx
— Rashid Khan (@rashidkhan_19) December 30, 2018
या खेळाडूच्या गोलंदाजीवर विकेटकीपिंग करणं कठीण : साहा दरम्यान, राशिद खानने आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी केली होती. राशिद खानच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. राशिद खान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात युवा कर्णधारSo much love and respect for this guy ????@rashidkhan_19 ready to bowl his first over of the night!
Thunder 1/67 after 8 overs #BlueEnergy #BBL08 pic.twitter.com/J1OFrZAZpe — Adelaide Strikers (@StrikersBBL) December 31, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement