INDvsNZ 2 Test | टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 242 धावांत गुंडाळला, न्यूझीलंडची सावध सुरुवात
भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या वेगवान आक्रमणासमोर लोटांगण घातलं. न्यूझीलंडनं टीम इंडियाचा पहिला डाव 242 धावांत गुंडाळला. न्यूझीलंडकडून काईल जॅमिसननं ४५ धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडलं. पण पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारीनं झळकावलेल्या अर्धशतकांनी भारतीय डावाला आकार दिला.
ख्राईस्टचर्च : ख्राईस्टचर्चच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 242 धावांत गुंडाळला. न्यूझीलंडकडून काईल जॅमिसननं 45 धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडलं. पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारीनं झळकावलेल्या अर्धशतकांनी भारतीय डावाला आकार दिला. त्यानंतर न्यूझीलंडनं सावध सुरुवात करत पहिल्या दिवसअखेर बिनबाद 63 धावांची मजल मारली. वेलिंग्टनपाठोपाठ ख्राईस्टचर्चच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या वेगवान आक्रमणासमोर लोटांगण घातलं.
भारतीय संघाने केलेल्या 242 धावांना प्रत्युत्तर देताना दिवसाअखेरीस न्यूझीलंडने बिनबाद 63 धावांपर्यंत मजल मारली आहे. सलामीवीर टॉम लॅथम 27 तर टॉम ब्लंडल 29 धावांवर खेळत आहे. त्याआधी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
IND vs SL, ICC Women's T20 WC | टीम इंडियाचा सलग चौथा विजय, श्रीलंकेचा सात विकेट्सने धुव्वा
कसोटी मालिकेत पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगली सुरुवात केली. पृथ्वी शॉने झळकावेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी उपहाराच्या सत्रापर्यंत 2 बाद 85 पर्यंत मजल मारली. ट्रेंट बोल्टने मयांक अग्रवालला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर पृथ्वीने चेतेश्वर पुजाराच्या सोबतीने भारतीय संघाचा डाव सावरला.पुजारासोबत त्याने दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे भारताचा डाव सावरला. मात्र अर्धशतक झाल्यानंतर त्याचा जेमिनसनच्या गोलंदाजीवर टॉम लॅथमने सुरेख झेल टिपला.त्यानंतर कर्णधार विराट 3 धावांवर साऊदीच्या गोलंदाजीवर तर रहाणे 7 धावांवर माघारी परतला. मात्र चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारीने संयमी खेळी करत भारताची अधिक पडझड थांबवली.
पाचव्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी 81 धावांची भागीदारी केली. शेवटी आलेल्या मोहम्मद शमीने फटकेबाजी करत भारताला 242 धावांपर्यंत मजल मारुन दिली. न्यूझीलंडकडून जेमिसनने 5, टीम साऊदी-ट्रेंट बोल्टने 2 तर निल वँगरने 1 विकेट घेतली.