यूनिफाईड पेमेंट इंटरफेज म्हणजे यूपीआय हा एक असा पर्याय आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही देशातील कोणत्याही व्यक्तीला अगदी सोप्या पद्धतीने पैसे पाठवू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खात्याचा क्रमांक माहित असणं गरजेचं नाही. केवळ अकाऊंटशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरुनही तुम्ही पैसे पाठवू शकता. बँकांना या पेमेंटची परवानगी एनपीसीआय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑप इंडियाने दिलेली आहे. ज्यामुळे प्रत्येक बँक NEFT, IMPS यांसोबतच यूपीआयचाही पर्याय देते.
2/8
व्हॉट्सअॅप आता केवळ मेसेजवर बोलण्यापर्यंतच मर्यादित राहिलेलं नाही. व्हाॅट्स अॅप पेमेंट फीचर भारतात रोल आऊट झालं आहे, ज्यामुळे तुम्हाला आता व्हॉट्स अॅपवरुन पैसेही पाठवता येणार आहेत. व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरमुळे भारतातील ई-वॉलेट कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. तुमच्या मोबाईलमध्ये ही अपडेट आली नसेल तर अॅप अपडेट करून ती मिळवू शकता. अपडेट करूनही मिळत नसेल तर पुढच्या काही तासातच सपोर्टेड फोनला ही अपडेट मिळेल. हा नवा पेमेंट ऑप्शन अटॅचमेंट ऑप्शनमध्येच आहे. फोटो, ऑडिओ, व्हिडीओ या सर्व पर्यायांसोबतच तुम्हाला आता पेमेंट ऑप्शन दिसणार आहे.
3/8
पेमेंट फीचर पाहण्यासाठी तुम्हाला अटॅचमेंट ऑप्शनमध्ये जावं लागेल, जिथे ऑडिओ, कॉन्टॅक्ट, व्हिडीओ असे ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. पेमेंटवर क्लिक करताच तुम्ही यूपीआय पेजशी जोडले जाल. तुमचं यूपीआय अकाऊंट नसेल तर ते तुम्ही यूपीआय अॅप किंवा बँकेच्या अॅपवर जाऊन तयार करु शकता.
4/8
त्यानंतर तुम्हाला तुमचा नंबर बँकेशी लिंक करावा लागेल. जो नंबर बँकेत नोंदणीकृत आहे त्यावर व्हेरिफिकेशन प्रोसेस मेसेजद्वारे होईल.
5/8
मेसेजद्वारे व्हेरिफाय करण्यासाठी पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला जो नंबर लिंक करायचाय ते सिम सिलेक्ट करावं लागेल
6/8
तुमचं अगोदरच यूपीआय अकाऊंट असेल तर पुढच्या स्टेपमध्येच पेमेंट फीचर सुरु झालेलं असेल. तुम्हाला ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याच्याकडेही हे नवं फीचर असणं गरजेचं आहे. (मोबाईलमध्ये भीम अॅप असेल तरीही दुसरं स्वतंत्र यूपीआय अकाऊंट तयार करण्याची गरज नाही)
7/8
मेसेजने व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची बँक निवडा
8/8
पेमेंट फीचरवर पहिल्यांदा क्लिक केल्यानंतर अॅक्सेप्ट अँड कन्टिन्यू हा आॅप्शन येईल