ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2025 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. नाशिकमध्ये अनधिकृत सातपीर दर्गा रातोरात हटवला, जमावाकडून पोलिसांवर दगडफेक, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात https://tinyurl.com/45wbkwpn नाशिकच्या दर्ग्यावर बुलडोझर फिरवण्यासाठी आजचा दिवसच का निवडला? संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले शिबीरात अडथळे घालण्याचे प्रयत्न https://tinyurl.com/4yj3vkev
2. रायगडावर येऊन अमित शाहांकडून छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख, त्यांनी आम्हाला शिवरायांबद्दल सांगू नये, नाशिकच्या निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/bdz73626 चंद्रकांत खैरे हिंदुत्त्वाचा मूर्तिमंत चेहरा, ते शिवसेनेचे शंकराचार्य; संजय राऊतांची खैरेंवर स्तुतीसुमनं, नाशिकमधील 'आम्ही इथेच' चर्चासत्रात शिवसेनेच्या आठवणींना उजाळा https://tinyurl.com/4bf4vyd4 भाजप उन्माद हत्तीसारखं वागतोय, हा उन्मादपणा संपवायचाय; शिवसेनेच्या नाशिकमधील निर्धार मेळाव्यातून अंबादास दानवेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/e92e94c9
3. जिथं जमीन अधिग्रहणाची घोषणा झालीय तिथल्या जमिनी विकू नका, मुख्यमंत्री फडणवीसांची शेतकऱ्यांना भावनिक साद, म्हणाले कोणीतरी धन्नाशेठ येतो अन् शेतकऱ्यांच्या जमिनी घेतो https://tinyurl.com/yxcrdfvc मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचे उद्घाटन संपन्न; मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच मामाच्या घरी https://tinyurl.com/45mzhm9t
4. राज ठाकरे अन् एकनाथ शिंदेंची भेट, स्नेहभोजन; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले मी जास्त महत्त्व देत नाही https://tinyurl.com/muxe3dzn राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? मंत्री उदय सामंत म्हणाले राजकीय चर्चा झाली नाही https://tinyurl.com/y6k6h4hm
5. अशी काय मैत्री होती की मुख्यमंत्री स्वतःच्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावरून आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले, बीडचा आका कोण हे सगळ्यांना माहिती https://tinyurl.com/2ate4y7m वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर मिळाल्याचा दावा करणारा रणजीत कासले बीड पोलिसांना शरण येणार, म्हणाला, सिस्टीम विरोधात जास्त दिवस लढता येत नाही, मी पोलिसांना शरण येणार https://tinyurl.com/2pcmneh7
6. शिंदे गटाचे दोन शिलेदार मनोज जरांगेंच्या भेटीला, उदय सामंत-संदीपान भुमरेंची बंद दाराआड चर्चा, 23 एप्रिलला मुख्यमंत्र्यांना भेटणार, मराठा आरक्षणावर चर्चा करणार https://tinyurl.com/ynecv2kp मंत्री महोदयांनी दोस्तासाठी वाट वाकडी केली, उदय सामंतांनी जरांगेच्या कार्यालयात भेट दिली https://tinyurl.com/3xx7ey6z
7. शेकापच्या जयंत पाटलांचे चुलत बंधू पंडित पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश, जयंत पाटील म्हणाले ते आधीच गेले होते, पक्षाला कोणताच फरक पडणार नाही https://tinyurl.com/yu2mram5 राज्यातील सगळे इतिहासकार शरद पवारांच्या बाजूचे, पवारांच्या जवळच्या संघटना ऐतिहासिक विषय उकरुन काढतात; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन गोपीचंद पडळकरांची टीका https://tinyurl.com/5n835ped
8. पुण्यातील 12 रुग्णालयांनी वाजवले धर्मादाय कायद्याचे बारा; वर्षभरात एकाही रुग्णावर सवलतीमध्ये उपचार नाहीत https://tinyurl.com/4j7mcyb7 मंगेशकर रुग्णालयाने आमची बदनामी केली, केळकरांनी दिलेली माहिती खोटी; तनिषा भिसेंच्या कुटुंबीयांनी रेशनकार्ड दाखवून सगळंच बाहेर काढलं https://tinyurl.com/4b9vrxsy
9. नांदेडमधील तहसीलदाराकडून मुलासाठी पत्नीचा शारीरिक छळ, जादूटोणा केला अन् पिस्तुलाने ठार मारण्याची धमकी https://tinyurl.com/2ux2ppbj नांदेड हादरलं! गुंगीचं औषध देऊन 16 वर्षीय मुलीवर उपसंरपंचाकडून अत्याचार; संबंधातून बाळाला जन्म दिला पण नराधमाने बाळही विकल्याचा संशय https://tinyurl.com/36s2bknn
10. योगी सर्वात मोठे भोगी, मुर्शिदाबाद दंगलीत भाजप बीएसएफचं संगनमत, बांगलादेशी घुसखोर बोलवून दंगल केली; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप https://tinyurl.com/3p6z63ae अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चायनावर आर्थिक सर्जिकल स्ट्राईक सुरुच; नव्याने 100 टक्के कर लादत 245 टक्क्यांच्या घरात नेला
https://tinyurl.com/muj65a5y
*एबीपी माझा स्पेशल*
आता धावत्या रेल्वेत काढता येणार पैसे, पंचवटी एक्स्प्रेसमध्ये ATM ची सोय https://tinyurl.com/2ptr6xuk
झहीर खानच्या घरी पाळणा हलला, सागरिका घाटगेकडून गोंडस बाळाला जन्म; मुलाचं नाव ठेवलं फतेह सिंग खान https://tinyurl.com/3esav9dy
कुमार मंगलम बिर्लांना लता मंगेशकर पुरस्कार तर सचिन पिळगावकर, शरद पोंक्षेंना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर https://tinyurl.com/42purhdm
























