एक्स्प्लोर

Housing News : पहिल्या तिमाहीत घरांची विक्री मंदावली: प्रॉपटायगर डॉटकॉम

Housing News : मालमत्तेच्या वाढत्या किमतीमुळे नवीन लॉन्च प्रकल्पही रखडले असून बंगळूर आणि चेन्नई वगळता सर्व शहरांत घरांची विक्री कमी झाल्याचं अहवाल सांगतोय.

मुंबई: डिजिटल रिअल इस्टेट ट्रान्झॅक्शन अँड अॅडव्हाईझरी प्लॅटफॉर्म प्रॉपटायगर डॉटकॉमच्या अलीकडच्या अहवालानुसार, जानेवारी ते मार्च या कालावधीत देशभरातील आठ प्रमुख बाजारपेठांमध्ये घरांची विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत १९ टक्क्यांनी कमी झाली आणि त्याचे कारण आहे मालमत्तेच्या वाढत्या किमती आणि मंदावलेल्या वृद्धीमुळे खरेदीदार सावधगिरी बाळगून आहेत.

हाऊसिंग डॉटकॉमचे स्वामित्व ज्यांच्याकडे आहे त्या आरईए इंडियाचाच एक भाग असलेल्या प्रॉपटायगर डॉटकॉमने सादर केलेल्या रिअल इनसाइट रेसिडेन्शियल: क्यू१ २०२५ (जानेवारी-मार्च २०२५) अहवालानुसार या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नवीन घरांचा पुरवठा देखील १० टक्के कमी झाला आहे, कारण विकासकांनी गेल्या काही वर्षांमधील किंमतीत झालेल्या नाट्यमय वृद्धीनंतर स्वतःच्या अपेक्षाही वाढवल्या, ज्यामुळे जगातील सर्वाधिक लोकवस्ती असलेल्या आपल्या देशात मोठ्या भागाच्या खरेदीदारांसाठी घर खरेदी करणे परवडण्याजोगे राहिले नाही.

हाऊसिंग डॉटकॉम आणि प्रॉपटायगर डॉटकॉमचे ग्रुप चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री. ध्रुव अग्रवाला म्हणाले, “वाढत्या महागाईचा विपरीत परिणाम विक्रीवर आधीच दिसू लागला आहे. त्यात जागतिक ट्रेड-वॉरमुळे नवीन अनिश्चितता आली आहे. त्यामुळे हे स्वाभाविक आहे की, खरेदीदार गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगत आहेत आणि विशेष करून रिअल इस्टेट सारख्या मोठ्या गुंतवणुकीच्या बाबतीत ते अधिकच सावध झाले आहेत. जर भारतीय रिझर्व बँकेने फेब्रुवारीत २५-बेसिस पॉइंटने दर कमी केल्याचे जाहीर केले नसते, तर विक्रीतील ही घट अधिकच तीव्र झाली असती.”

बंगळूर आणि चेन्नई वगळता सर्व शहरांत विक्री कमी झाली

या अहवालानुसार, जानेवारी-मार्च या तिमाहीत १००,००० पेक्षा कमी घरे विकली गेली. या विश्लेषणात समाविष्ट करण्यात आलेल्या बहुतांशी शहरांत ही संख्या घटल्याचे दिसते. बंगळूर आणि चेन्नईमध्ये हा ट्रेंड दिसला नाही, तर हैदराबाद, मुंबई आणि पुण्यात ही विक्री तीव्रतेने कमी झालेली दिसली.

बंगळुरूमध्ये २०२४ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ११,७३१ घरांच्या विक्रीसह १३%ची वाढ पहायला मिळाली. चेन्नईमध्ये ही ४,७७४ घरांच्या विक्रीसह ८%ची वाढ झाली. या तुलनेत इतर प्रमुख शहरांत घरांच्या विक्रीत घसरण झालेली पहायाला मिळाली. यात अहमदाबाद १०,७३० (-१७%), दिल्ली एनसीआर ८४७७ (-१६%), हैदराबाद १०,४६७ (-२६%), कोलकाता ३,८०३ (-१%), मुंबई ३०,७०५ (-२६%), आणि पुणे १७,२२८ (-२५) येथे घरांची विक्री मंदावलेली दिसली.

मार्केट करेक्शनचे संकेत नवीन पुरवठ्यात जी घट आली आहे त्यातून देखील दिसत होते. आठ पैकी पाच शहरांतील नव्या घरांच्या लॉन्चच्या संख्येत वार्षिक घट दिसून आली. पुणे, हैदराबाद आणि अहमदाबादेत संख्येच्या दृष्टीने सर्वात तीव्र घसरण झाल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे.

पुणे, हैदराबाद आणि अहमदाबादमध्ये २०२४ च्या तुलनेत नवीन लॉन्च झालेल्या घरांच्या संख्येत क्रमशः १५,५४३ (-३८%), १०,१५६ (-३३%), २,३८४ (-२३%) ची घट झाली आहे. इतर प्रमुख शहरे जसे की चेन्नई ४,०७० (-१४%), मुंबई ३१,३२२ (-१५%) येथे ही नवीन लॉन्च प्रकल्पात घट झाली असल्याचे पहायला मिळाले. याउलट बंगळुरू, दिल्ली एनसीआर आणि कोलकाता येथे मात्र नवीन लॉन्च प्रकल्पात वाढ झाली आहे. ही वाढ क्रमशः १८,१८३ (८२%), ७,९५२ (१६%) आणि ३,५३४ (१३८%) इतकी आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ

व्हिडीओ

Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget