एक्स्प्लोर

RBI : रिझर्व्ह बँकेचा आणखी एका सहकारी बँकेला दणका, बँकिंग परवाना रद्द, खातेदारांच्या पैशांचं काय होणार?

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बुधवारी आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई केली आहे. आरबीआनं त्या बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. 

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बुधवारी आणखी एका सहकारी बँकेवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयनं त्या बँकेचा बँकिंग परवाना रद्द करत असल्याची घोषणा केली. बँकेकडे योग्य प्रमाणात रोख रक्कम नसून नफा मिळवण्याची शक्यता नाही, या निष्कर्षामुळं आरबीआयनं अहमदाबाद येथील कलर मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई केली आहे. 

आरबीआयनं कलर मर्चंटस को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. बँकेचं सुरु राहणं भविष्यात ठेवीदारांसाठी धोकादायक ठरु शकतं. सध्याच्या आर्थिक स्थितीत बँक सध्याच्या ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे परत करण्यात असक्षम  आहे. यामुळं बँकेचे ग्राहक त्यांच्या पैशाचं काय होणार या विचारानं त्रस्त आहेत. 

ग्राहकांच्या पैशाचं काय होणार?

रिझर्व्ह बँकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार गुजरातमधील सहकारी संस्थांच्या रजिस्ट्रारला बँक बंद करणे आणि प्रशासक नियुक्त करण्यासंदर्भातील आदेश जारी करण्याची सूचना देण्यात आली आहे. आता डीआयसीजीसीच्या नियमानुसार ठेवीदारांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीवरील विमाच्या रक्कम मिळवण्यासंदर्भात दावा करता येईल.सहकारी बँकेनं दिलेल्या आकडेवारीनुसार जवळपास 98.51 टक्के ठेवीदार डीआयसीजीसीकडून त्यांची पूर्ण रक्कम मिळवू शकतात. 31 मार्च 2024 पर्यंत डीआयसीजीसीनं बँकेशी संबंधित ठेवीदारांच्या इच्छेनुसार विम्यासाठीच्या जमा रकमेतून 13.94 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. 

आरबीआयनं कलर मर्चंटस को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्याचं कारण बँकेंकडून पुरेशी रोकड उपल्बध नसणे याशिवाय बँक नफा कमावण्याची शक्यता नाही. सहकारी बँक बँकिंग अधिनियमातील काही अटींचं पालन करण्यात बँक अयशस्वी ठरली. आरबीआयनं बँकेला यापुढं बँकिंग कामकाज सुरु ठेवण्याची परवानगी दिल्यास जनहितावर विपरीत परिणाम झाला असता.  त्यामुळं कलर मर्चंटस को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द झाल्यामुळं बँकेचा कारभार आजपासून बंद असेल. 

इतर बातम्या :

Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स- निफ्टीमध्ये वाढ, गुंतवणूकदार मालामाल

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
Mhada : मुंबईच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील 864 सदनिकांचं वितरण 16 मार्चला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा
मुंबईच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 864 सदनिकांचं वितरण 16 मार्चला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा
Gratuity Rules :  'या' चुकीमुळे कंपनी रोखू शकते ग्रॅच्युइटीचे पैसे
Gratuity Rules :  'या' चुकीमुळे कंपनी रोखू शकते ग्रॅच्युइटीचे पैसे
Gold Price: इराण-इस्रायल युद्ध सुरू असताना सोन्याच्या किमतीत घसरण का? आता दर वाढणार की कमी होणार? जाणून घ्या सविस्तर
इराण-इस्रायल युद्ध सुरू असताना सोन्याच्या किमतीत घसरण का? आता दर वाढणार की कमी होणार? जाणून घ्या सविस्तर

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget