IPL 2025, PBKS vs KKR, Yuzvendra Chahal: बुद्धिमान चहलमुळे पंजाब हर्षित!

IPL 2025, PBKS vs KKR, Yuzvendra Chahal: काल झालेल्या पंजाब विरुद्ध कलकत्ता सामन्यामध्ये चहल ची बुद्धिमानी गोलंदाजीमुळे पंजाब संघ कमी धावसंख्येचा बचाव करीत असताना विजयी झाला...
क्रिकेट इज गेम ऑफ ग्लोरियस अन्सरटंटिस... हे वाक्य आज चंदीगड मध्ये पुन्हा खरे ठरले...
या आधी पंजाब संघाला 244 धावांचा बचाव हैदराबाद संघासमोर करता आलेला नाही.. जिंकण्यासाठी फक्त 112 धावांचे आव्हान असताना सुद्धा कलकत्ता संघ गडगडला... याला कारण होते चहलची गोलंदाजी... आणि हुषार श्रेयस... त्याने वेंकटेश आल्यावर मॅक्स वेलला दिलेली गोलंदाजी... हर्षित राणासाठी पुन्हा आणलेला मार्को जन्सन... त्याने रमण दीपचा फटका पाहून केलेलं अँटीसेपेशन... कलकत्ता संघाच्या प्रत्येक फलंदाजासाठी लावलेलं क्षेत्ररक्षण तो हुशार कर्णधार आहे याची साक्ष देतात...
चहल फक्त बुद्धिबळ खेळत नाही... तर तो बुद्धिबळाचा वापर मैदानात देखील करीत असतो... आजच्या सामन्यात त्याने रिंकूसाठी टाकलेल्या कमी गतीचा लेगब्रेक त्याला रिंकूचा बळी मिळवून गेला... रघुवंशी कव्हर मधून खेळेल आणि कदचित झेल बॅकवर्ड पॉईंट वर येईल याचे अँटीसेपेशन...रमण साठी टाकलेला चेंडू. या सगळ्याच गोष्टी त्याने हुशारीने केल्या होत्या...
पंजाब संघाकडून जॉन्सन आणि मॅक्सवेल ने उत्तम गोलंदाजी करून पंजाब चा अशक्य असलेला विजय मिळवून दिला....
आज पंजाब संघाच्या गलथान क्षेत्ररक्षणामुळे कलकत्ता संघाला 5 चौकार मिळाले... ज्या संघाचे प्रशिक्षक पाँटिंग आहेत ते असल्या चुका माफ करणार नाहीत...
कलकत्ता संघाकडून पुन्हा एकदा रघुवंशी ने नयनरम्य फलंदाजी केली... त्याने बसून मारलेला एक स्क्वेअर ड्राईव्ह... एक फ्लिक... आणि एक कव्हर ड्राईव्ह रोहित शर्माची आठवण देऊन गेला...धावांचा पाठलाग करताना कदाचित चद्रकांत पंडित त्याचा सलामीसाठी उपयोग करू शकतील....
आज अजिंक्य ने स्वतःसाठी एक रिव्ह्यू घेतला असता तर कदचित या सामन्याचा निर्णय वेगळा लागू शकला असता... पण आता हा जर तर चा इतिहास आहे...
काल नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम फलंदाजीचा निर्णय पंजाब संघाच्या फलंदाजांनी केलेली फटक्यांची निवडीने वर्थ ठरविला... प्रभ सिमरन आणि प्रियांश याने 39 धावांची सलामी दिली... पण नंतर हर्षित राणा याने प्रभ सिमरन.. प्रियांश आणि श्रेयस यांना तंबूचा वाट दाखविली... त्यानंतर नारायण आणि वरुण या दोघांनी कलकत्ता संघाला वर डोके काढून दिले नाही... वरुण ने टाकलेले राँग वन हे सर्वांसाठी कोडेच आहे... आणि ते आज ही कोडे राहिले. इंग्लिस आणि मॅक्सवेल हे त्याचे आजचे बळी होते..नारायण आणि वरूण या दोघांनी 35 धावत 4 बळी घेऊन मधली फळी कापून काढली... आणि पंजाब संघाचा डाव 111 धावत रोखला गेला...
आज झालेल्या सामन्यात पंजाबनं आयपीएलमध्ये सगळ्यात कमी धावसंख्येचा बचाव करून इतिहास घडविला... चहल याने सगळ्यात जास्त वेळा चार बळी घेण्याचा (8 वेळा) इतिहास घडविला... त्यानेच कलकत्ता संघाच्या विरुद्ध 33 बळी घेऊन आणखीन एक इतिहास घडविला... पंजाब संघ अजून ही आय पी एल चे विजेतेपद मिळवू शकला नाही... ते या वेळी मिळाले तर आणखीन एक नवा इतिहास श्रेयस आणि त्याचे सहकारी घडवतील...
आजच्या सामन्यानंतर श्रेयस ने मनातल्या मनात ठुकरा के मेरा प्यार हे गाणे कलकत्ता संघासाठी गायले असेल.


























