एक्स्प्लोर
SOCIAL MEDIA : सोशल मीडियावर डेटा प्रायव्हेट ठेवण्याच्या सोप्या ट्रिक्स; वापरून पाहाचं!
SOCAILMEDIA : सोशल मीडिया वापरताना आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. चुकीच्या सेटिंग्समुळे तुमचा डेटा, फोटो किंवा लोकेशन चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो.
SOCIAL MEDIA
1/10

सोशल मीडिया वापरताना आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. चुकीच्या सेटिंग्समुळे तुमचा डेटा, फोटो किंवा लोकेशन चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो.
2/10

प्रायव्हसी सेटिंग तपासा : फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर (X) यांसारख्या प्लॅटफॉर्मवर "Privacy" किंवा "Settings" मध्ये जाऊन पोस्ट, फोटो आणि प्रोफाइलची व्हिजिबिलिटी फक्त Friends किंवा Followers पर्यंत मर्यादित ठेवा.
3/10

लोकेशन शेअरिंग बंद ठेवा : पोस्ट करताना Live Location किंवा Check-in ऑप्शन टाळा. लोकेशनमुळे तुमच्या हालचालींचा मागोवा घेता येतो.
4/10

फ्रेंड रिक्वेस्ट फिल्टर करा : फक्त ओळखीच्या लोकांनाच ऍड करा. अनोळखी लोकांकडून आलेल्या रिक्वेस्ट स्वीकारू नका.
5/10

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा : अकाउंट लॉगिन करताना पासवर्डसोबत OTP किंवा सिक्युरिटी कोडची आवश्यकता ठेवा. यामुळे अकाउंट हॅक होणं कठीण होतं.
6/10

अँप परमिशन्स तपासा : सोशल मीडिया आप्सना कॅमेरा, मायक्रोफोन, कॉन्टॅक्ट्स किंवा गॅलरी ऍक्सेस देताना विचार करा. अनावश्यक परमिशन्स बंद करा.
7/10

ई-मेल आणि फोन नंबर लपवा : प्रोफाइलवर वैयक्तिक माहिती Public ठेवू नका. ई-मेल आणि नंबर फक्त आवश्यकतेनुसार वापरा.
8/10

जुने पोस्ट रिव्ह्यू करा : जुने पोस्ट, फोटो, कमेंट्स प्रायव्हेट किंवा डिलीट करून टाका, जेणेकरून अनावश्यक माहिती उपलब्ध राहणार नाही.
9/10

फिशिंग मेसेजपासून सावध रहा : अनोळखी लिंक, फेक ऑफर्स किंवा फ्री गिफ्ट मेसेजवर क्लिक करू नका.
10/10

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 13 Aug 2025 10:27 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण
























