Nitesh Rane : झाडांचा गेम, बकऱ्यांवरून नेम; पर्यावरणप्रेम आणि बकऱ्यांचा संबंध तरी काय? Special Report
Nitesh Rane : झाडांचा गेम, बकऱ्यांवरून नेम; पर्यावरणप्रेम आणि बकऱ्यांचा संबंध तरी काय? Special Report
नितेश राणे... फडणवीसांच्या टीममधलं एक महत्त्वाचं नाव... सिंधुदुर्गातल्या निवडणुकांची मोहीम संपवून नितेश राणेंनी आपला मोर्चा नाशिकमधल्या तपोवनाच्या मुद्द्याकडे वळवला.. तपोवनातल्या वृक्षतोडीला विरोध म्हणजे हिंदुत्वाला विरोध असा युक्तिवाद नितेश राणेंनी सुरू केला.. आणि हा युक्तिवाद करताना नितेश राणेंची गाडी ईदसाठी कुर्बान केल्या जाणाऱ्या बकऱ्यांकडे कधी वळली हे कुणालाच कळलं नाही... आणि मग त्यानंतर सुरू झाले राजकीय शोले... पाहुयात
यावर्षीची बकरी ईद तर जूनमध्ये झालीय...
मग भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नितेश राणे, तावातावाने शब्दांचा सुरा का चालवताहेत?
असा प्रश्न खुद्द बकऱ्यांनाही पडला असेल...
तर त्याचं झालं असं...
इकडे सिंधुदुर्गातील निवडणुकांची जबाबदारी पार पाडून नितेश राणे नुकतेच फ्री झाले होते...
तर तिकडे, कुंभमेळ्यासाठी नाशिकमधल्या तपोवनातली झाडं तोडायला, पर्यावरणप्रेमींबरोबरच अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेनं जोरदार विरोध केलाय..
आपला पक्ष तपोवनातल्या खिंडीत एकटा पडल्याचं कळल्यानंतर नितेश राणे मैदानात उतरले
आणि वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी हिंदुत्त्वाची तलवार उगारली
All Shows





महत्त्वाच्या बातम्या





























