Share Market Avadhut Sathe: मोठी बातमी: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Share Market Avadhut Sathe: शेअर मार्केट गुरु अवधूत साठे यांच्यावर सेबीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांना भांडवली बाजारातून हद्दपार करण्यात आले आहे.

Share Market Avadhut Sathe: गेल्या काही वर्षांमध्ये शेअर मार्केटमध्ये झटपट कमाई करुन देण्याच्या युक्त्या आणि तंत्र शिकवण्याच्या अभ्यासक्रमामुळे नावारुपाला आलेले शेअर मार्केट गुरु अवधूत साठे (Avadhut Sathe) यांच्यावर भांडवली बाजार नियंत्रक संस्था अर्थात सेबीने (SEBI) मोठी कारवाई केली आहे. सेबीने अवधूत साठे यांना शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्यास बंदी केली आहे. तसेच गुंतवणुकदारांकडून घेतलेले 601 कोटी रुपये तातडीने परत करण्याचे निर्देश दिले आहेत. हा अवधूत साठे आणि त्यांच्या शिष्यांसाठी मोठी झटका मानला जात आहे. सेबीच्या या कारवाईमुळे अवधूत साठे यांना शेअर मार्केटमधील गुरु मानाणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियावर अवधूत साठे ट्रेडिंग अॅकेडमीचे (share market training) प्रस्थ वाढले होते. या संस्थेत शेअर मार्केटचे अनेक अभ्यासक्रम शिकवले जात होते. भांडवली बाजारातून झटपट आणि हमखास कमाई करण्यासाठी शिकवण्यात येणाऱ्या या अभ्यासक्रमांसाठी हजारो रुपयांचे शुल्क आकारले जात होते. त्यामुळे सोशल मीडियावर अवधूत साठे यांची प्रचंड हवा निर्माण झाली होती. मात्र, आता सेबीच्या कारवाईमुळे अवधूत साठे यांना मोठा झटका बसला आहे. (Share Marekt news)
सेबीने केलेल्या तपासात अवधूत साठे ट्रेडिंग अॅकेडमीने कोणतीही कायदेशीर नोंदणी नसताना गुंतवणूक सल्लागार म्हणून कारभार सुरु केल्याचे समोर आले होते. त्यांच्या शेअर मार्केट ट्रेनिंग अभ्यासक्रमाच्या माध्यमातून गुंतवणुकदारांना टिप्स दिल्या जात होत्या. याशिवाय, त्यांच्याकडून स्टॉक मार्केट अॅनालिसिससंबधी मार्गदर्शन केले जात होते. मात्र, अवधूत साठे यांनी यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे सेबीकडून अवधूत साठे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सेबीकडून यासंदर्भात 125 पानी आदेशपत्र जारी करण्यात आले आहे. यामध्ये अवधूत साठे हे त्यांच्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी विशिष्ट समभाग खरेदी किंवा विकण्यासाठी सांगत होते. भांडवली बाजाराचे शिक्षण देण्याच्या नावाखाली हा प्रकार सुरु होता. संस्थेतील विद्यार्थ्यांकडून अवधूत साठे यांनी भांडवली बाजारात लावण्यासाठी पैसे गोळा केले होते. जवळपास 3 लाख गुंतवणुकदारांकडून अवधूत साठे ट्रेडिंग अॅकेडमीने 601 कोटी रुपये गोळा केले होते. हे सर्व पैसे तातडीने परत करण्याचे निर्देश सेबीने दिले आहेत.
सेबीने (SEBI) अवधूत साठे (Avadhut Sathe) यांना पुढील आदेशापर्यंत सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यवहार करण्यापासून प्रतिबंधित केले आहे. साठे यांना स्वतःच्या किंवा त्यांच्या कोर्समध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीची जाहिरात करण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबई, दिल्ली, चंदीगढ, कोलकाता, भुवनेश्वर, बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद येथे अवधूत साठे ट्रेडिंग अॅकेडमीकडून शेअर मार्केटचे प्रशिक्षण वर्ग चालवले जात होते.
आणखी वाचा
























