Beed News: दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
Beed News जिल्हा परिषदेतील शिक्षकांना दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे चांगलेच अंगलट आले आहे.

Beed News: बीडच्या जिल्हा परिषद शाळेतील (Zilla Parishad School) दिव्यांग शिक्षकांनी (Teachers) दिव्यांगत्वाचे यूडीआयडी कार्ड (UDID Card) सादर न केल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 14 शिक्षकांना निलंबित केले आहे. दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर प्रशासनाच्या तपासणी मोहिमेदरम्यान दिवंगत्वाचे यूडीआयडी सादर न करणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या अंगलट येऊ लागले आहे. (Beed News)
बुधवारी चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता 14 शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी रहेमान यांनी निलंबित केले आहे. या शिक्षकांसह आणखी काही शिक्षकांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. दिव्यांग विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार घेतल्यानंतर राज्यातील सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिव्यांग कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र खरे आहे की बनावट याची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
Beed News: आतापर्यंत 300 हून अधिक कर्मचाऱ्यांची तपासणी
यानंतर तपासणी मोहीम सुरू झाली आणि याच तपासणीदरम्यान बीडमध्ये 14 शिक्षकांना यावेळी निलंबित करण्यात आले आहे. 300 हून अधिक कर्मचाऱ्यांची तपासणी आतापर्यंत झाली आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 91 नुसार दिव्यांग नसलेल्या व्यक्तीने बनावट प्रमाणपत्र करून त्याद्वारे लाभ मिळवण्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर गुन्हा नोंद करता येतो. त्यानंतर त्याला एक लाखापर्यंत दंड आणि दोन वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते.
Dhule News: धुळ्यात गुन्ह्यांचा मुद्देमाल जमा न करणारे दोन पोलीस निलंबित
दरम्यान, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्यात पूर्वी नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार महेंद्र जाधव आणि शरद ठाकरे या दोन कर्मचाऱ्यांनी तब्बल दोनशेहून अधिक गुन्ह्यांचा मुद्देमाल गहाळ केल्याची बाब पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निदर्शनास आली आहे. याबाबत त्यांना वारंवार सांगून देखील तसेच पुरेसा वेळ देऊन चौकशी करून देखील तो किमती मुद्देमाल जमा करण्यात आलेला नसल्याने या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबन करण्याची कारवाई पोलीस अधीक्षकांनी केली आहे. या दोघांवर निजामपूर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोघेही पोलीस कर्मचाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता कलम 314 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांवर अशा पद्धतीने कारवाई होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
























