एक्स्प्लोर
पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णवेध घेणारी 'Avani Lekhara', अपघातामुळं अपंगत्व, अभिनव बिंद्राच्या आत्मचरित्रामुळं जगण्याची नवी उमेद

Tokyo Paralympics (File Photo)
1/9

Avani Lekhara Biography : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये नेमबाज अवनी लेखरानं देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखाराला सुवर्ण पदक मिळालं आहे. (PHOTO : @avani.lekhara/instagram)
2/9

निशानेबाज अवनी लेखरा मूळची राजस्थानातील जयपूरची राहणारी आहे. अवनी लेखराच्या वडिलांचं नाव प्रवीण लेखरा, तर आईचं नाव श्वेता लेखरा आहे. (PHOTO : @avani.lekhara/instagram)
3/9

2012 मध्ये अवनी लेखरा आपल्या वडिलांसोबत जयपूरच्या धौलपूरला जात होती. त्यावेळी रस्त्यात तिच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात अवनी लेखरा आणि तिचे वडिल प्रवीण लेखरा दोघांनाही गंभीर दुखापत झाली. प्रवीण लेखरा लवकर बरे झाले. अवनीला मात्र या अपघातात अपंगत्व आलं. (PHOTO : @avani.lekhara/instagram)
4/9

अपघातामुळं अवनी पुन्हा कधीच स्वतःच्या पायावर उभी राहू शकणार नव्हती. त्यावेळी ती अत्यंत निराश झाली, तिनं स्वतःला एका खोलीत बंद केलं. त्यावेळी तिनं अभिनव बिन्द्राचं आत्मचरित्र वाचलं. त्यामुळे तिला प्रेरणा मिळाली आणि तिनं निशानेबाजीत आपलं करिअर करण्याचा निश्चय केला. (PHOTO : @avani.lekhara/instagram)
5/9

अवनी लेखरानं आपल्या घराजवळच्याच शूटिंग रेंजवर आपला सराव सुरु केला. यामध्ये अवनीला तिच्या कोचनी खूप साथ दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखील अवनीनं आपला सराव पूर्ण केला. (PHOTO : @avani.lekhara/instagram)
6/9

अवनीनं आतापर्यंत जागतिक स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये पदकं मिळवली आहेत. दरम्यान, आज पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून अवनीनं इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारी अवनी पहिली भारतीय महिला ठरली आहे. (PHOTO : @avani.lekhara/instagram)
7/9

(PHOTO : @avani.lekhara/instagram)
8/9

(PHOTO : @avani.lekhara/instagram)
9/9

(PHOTO : @avani.lekhara/instagram)
Published at : 30 Aug 2021 11:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion