BMC Election 2026: मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी
Devendra Fadnavis on Thackeray Brothers: राज-उद्धव ठाकरेंनी एकत्र यायला खूप उशीर केला, मुंबईत भाजपच निवडून येईल; देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय सांगितलं?

Raj Thackeray & Uddhav Thackeray: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. कारण, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सोमवारपासून मुंबईत प्रचारसभा घ्यायला सुरुवात करणार आहेत. ठाकरे बंधू आता मैदानात उतरुन भाजप (BJP) आणि शिंदे गटाविरोधात तोफ डागणार आहेत. राज (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने शिवसेना आणि मनसेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठे यश मिळेल, अशी अटकळ त्यांच्या समर्थकांकडून बांधली जात आहे. मात्र, मुंबईत काही झालं तरी ठाकरे बंधूंनी यश मिळणार नाही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आहे. त्यासाठी त्यांनी भाजपची मुंबईबाबतची एक थिअरी 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत मांडली.
ठाकरे बंधूंच्या युतीला खूप उशीर झाला आहे. असं आहे की, या दोघांची मतं संपल्यावर हे दोघे एकत्र आले आहेत. 2009 साली राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असते तर वेगळा रिझल्ट लागला असता. आता दोघेही एकत्रित येऊन फायदा नाही. दोघांच्याही मतांची टक्केवारी इतकी कमी आहे की, आता यांना मराठी माणूसही मतं देणार नाही आणि अमराठी नागरिकही मतदान करणार नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, ठाकरे बंधू एकत्र आल्याची आ्हाला काहीच चिंता नाही. मुंबईत भाजप निश्चितपणे निवडून येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Devendra Fadnavis: ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं, देवेंद्र फडणवीसांचा सवाल
मराठी माणसाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न घराचा आहे. दक्षिण मुंबईत घरांच्या किंमती परवडत नाही म्हणून मराठी माणूस तिथून हद्दपार झाला. आज दक्षिण मुंबईतील प्रत्येक मराठी माणसाला आम्ही घरं देतोय. ठाकरे फक्त बोलत राहिले, मोर्चे काढले, मोर्च्यांनी पोट भरतं का? शिवसेनेची सत्ता असताना ठाकरेंनी मराठी माणसांच्या घरांसाठी एकतरी प्रकल्प केला का? आज आम्ही बीडीडी चाळीचा पुनर्विकास करुन 80 हजार मराठी माणसांना मुंबईतून हद्दपार होण्यापासून वाचवले. मी हा प्रकल्प खासगी बिल्डरच्या हातात जाऊन दिला नाही. त्यांचा इंटरेस्ट बिल्डरमध्ये होता. मी बीडीडी चाळीचा प्रकल्प म्हाडाच उभारेल, असा निर्णय घेतल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आणखी वाचा























